Sharad Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Onion Market : नाफेडने पावले उचलली तरच कांदा उत्पादक शेतकरी वाचेल : शरद पवार

कांद्याचे दर घसरले आहेत; केंद सरकारच्या नाफेडने कांदा खरेदी केल्यास शेतकरी वाचू शकेल.

Team Agrowon

Onion Market Update कराड : कांद्याचे दर (Onion Rate) घसरले आहेत. केंद सरकारच्या नाफेडने (NAFED) कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी (Onion Procurement) केल्यास तो शेतकरी वाचू शकेल. मात्र तसे होताना दिसत नाही.

राज्य सरकारने खरेदी सुरू केली आहे असे सांगितले आहे मात्र काल संध्याकाळ पर्यंत खरेदी केंद्र सुरू झालेले नव्हती.

ती तातडीने सुरू करणे गरजेचे आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (ता. ५) कराड (जि. सातारा) येथे व्यक्त केले.

कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजच्या कार्यक्रमासाठी खासदार पवार आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांधी संवाद साधला.

खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, जशराज पाटील आदी उपस्थित होते.

खासदार पवार म्हणाले, कांदा उत्पादक हा जिरायत शेतकरी असतो.

त्याचे एकच पीक असते, जे त्याला पैसे मिळवून देते. आज अनेक ठिकाणचे शेतकरी कांद्याचे दर घसरल्याने संकटात आले आहेत.

यावर केंद सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या नाफेडणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केली तर तो शेतकरी वाचू शकेल. मात्र तसे होताना दिसत नाही.

राज्य सरकारने खरेदी सुरू केली आहे असे सांगितले आहे मात्र काल संध्याकाळ पर्यंत खरेदी केंद्र सुरू झालेले नव्हती. ती तातडीने सुरू करणे गरजेचे आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाबद्दलही पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, कसबा हा भाजपचा मतदारसंघ होता, पण यावेळी तिथे त्यांना मतदान झालेले नाही. राज्यकर्त्यांच्या विरोधात मतदारांचे मत दिसते. चिंचवडमध्ये बंडखोरी झाली नसती तर चित्र वेगळे दिसले असंते.

आताच्या सरकारचे सत्तेचा गैरवापर करणे हे धोरण आहे. त्यासंदर्भात आम्ही विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना पत्र दिले आहे. राष्ट्रीय स्तरावर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे अशी चर्चा सुरू आहे.

नवाब मलिक यांच्यावर कोणत्या आधारे गंभीर आरोप करता आहात, अशी विचारणा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली. तुम्ही त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात होता त्यावेळी हे जाणवले नाही का?

भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची चौकशी थांबल्याचे एक तरी प्रकरण सांगावे असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकाना दिले आहे. त्याबाबत विचारले असता त्यांच्या शेजारी जे ठाण्याचे नेते बसतात त्यांच्यासह अनेकांची नावे घेता येतील, असा टोला खा. पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता लगावला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NCCF: ‘एनसीसीएफ’चे शाखा व्यवस्थापक ग्रोवर निलंबित

Agriculture Policy: केंद्राच्या धोरणांचा व्यापाऱ्यांनाही फटका

Gram Rozgar Assistant: ग्रामरोजगार सहायकांच्या बेमुदत आंदोलनाला किसान सभेचा पाठिंबा

Farm Road: गावशिवार रस्त्यांचे होणार सीमांकन

Pesticide Cost: कीटकनाशक फवारणी खर्चाने शेतकरी हैराण

SCROLL FOR NEXT