Onion Market Agrowon
ताज्या बातम्या

Onion Procurement : पुढील आठवड्यापासून ‘नाफेड’तर्फे कांदा खरेदी

Onion Market Update : सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल किमान ३५० तर कमाल ८०० ते ९०० रुपये भाव मिळत आहे. सध्या शेतकऱ्यांना सरासरी ६५० रुपये इतकाच भाव मिळत आहे.

Team Agrowon

Nashik News : ‘कांदा लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तातडीने कांद्याच्या भावात होणारी घसरण न थांबल्यास जिल्ह्यातील कांदा उत्पादक कर्जाच्या खाईत लोटले जातील.

त्यामुळे नाफेडने तातडीने कांदा खरेदी सुरू करावी, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी नाफेड प्रशासनाकडे केली. त्यावर पुढील आठवड्यापासून कांदा खरेदी सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन नाफेड प्रशासनाने दिल्याचे गोडसे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील दहा बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक होत आहे. मात्र मिळणारे दर समाधानकारक नाहीत. सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल किमान ३५० तर कमाल ८०० ते ९०० रुपये भाव मिळत आहे.

सध्या शेतकऱ्यांना सरासरी ६५० रुपये इतकाच भाव मिळत आहे. लागवडीसाठीचा खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यातून शेतकऱ्यांनी गोडसे यांच्याकडे भाववाढीसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली होती.

गोडसे यांनी पिंपळगाव येथील नाफेड कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कांद्यास अधिकचा भाव मिळण्यासाठी नेमकी काय भूमिका घ्यावी, याविषयीचा आढावा ‘नाफेड’चे निखिल पाडदे यांच्याकडून घेतला.

दरम्यान, ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील सुमारे ३ लाख टन कांदा खरेदी होणार आहे. पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू करत असल्याचे ‘नाफेड’च्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief : नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीसाठी एनडीआरएफमधून राज्यांना निधी कसा मिळतो?

PM Modi: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार ४२ हजार कोटींची भेट, दोन दिवसांत मोठी घोषणा

Farm Mechanization : नांदेडला कृषी यांत्रिकीकरणाचा खर्च केवळ ३० लाख खर्च

Rohit Pawar: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे घ्यावे: रोहित पवार

Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ३ लाख ५२ हजार हेक्टरला तडाखा

SCROLL FOR NEXT