Baba Adhav Agrowon
ताज्या बातम्या

Onion Issue : पुण्यात कांदा निर्यातीवर शुल्क वाढीच्या विरोधात बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

Onion Export Protest in Pune : कांदा निर्यातीवर लागू केलेले ४० टक्के शुल्क रद्द करावे, या मागणीसाठी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पुण्यात आंदोलन करण्यात आले होते.

Team Agrowon

Pune Onion News : कांदा निर्यातीवर लागू केलेले ४० टक्के शुल्क रद्द करावे, या मागणीसाठी शेतकरी व कष्टकरी यांच्या वतीने केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाबाहेर अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. २३)  सकाळी ११ वाजता हे आंदोलन करण्यात आले होते.

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव म्हणाले, की आम्ही सर्व जण पहिल्यापासून शेतकऱ्यांबरोबर आहोत. आम्ही शेतकऱ्याच्या अवलादीचे आहोत. यापुढे शेतकरी जी काही भूमिका घेईल त्या भूमिकेला आमचा जाहीर पाठिंबा असेल. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये आता नवीन ठिणगी पडलेली आहे. शेतकरी वर्ग न्याय मागण्यांसाठी वर्षानुवर्षे लढत आहे.

मागे सरकारने लावलेले तीन कायदे मागे घेतले. परंतु नव्याने शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभे राहिले आहे. आपल्या देशामधून परदेशामध्ये सर्वात जास्त कांदा निर्यात केला जातो. तो कांदा आता निर्यात करताना त्यावर ४० टक्के कर व अतिरिक्त दहा टक्के सेसदेखील लावणार आहे. असे करून शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय केला आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांबरोबर लबाडी करत आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे म्हणाले, की केंद्र सरकारवर हल्ला चढवून कांदा निर्यातीवर ४० टक्के लावलेला कर तातडीने रद्द केला पाहिजे नाहीतर आजूबाजूच्या देशांना त्यांचा फायदा होईल. तसेच निर्याती कर बरोबर दहा टक्के सेसदेखील वसूल करणार असल्याचे समजते.

त्याचा परिणाम कांदा उत्पादक हा बाजार आवरामध्ये कांदा घेऊन येणार नाही. एक लाखाचा कांदा निर्यात केल्यास ५० हजार रुपये शासनास अगोदर भरावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव मिळणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील निर्यात शुल्क नसावे, अशीच भूमिका घेतली आहे.

आंदोलनामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियन, हमाल पंचायत, तोलणार संघटना, शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी संघटना, टेम्पो पंचायत, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती. पथारी पंचायत, मोलकरीण संघटना अशा विविध संघटनांचे प्रतिनिधी शेतकरी कामगार आदी सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT