Sharad Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Sharad Pawar News : कांद्यावरील निर्यातशुल्क आजच मागे घ्या ; शरद पवारांची आग्रही मागणी

Onion Trader Strike : केंद्राकडून कांद्यावर ४० टक्के शुल्क लागू करण्यात आले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा निर्णय आहे. त्यामुळे सरकारने शुल्क वाढीचा निर्णय सरकारने आजच मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

Swapnil Shinde

Onion Export Duty : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या लिलाव बंदीचा आज सातवा दिवस आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार पेठेतील कांद्याचे व्यवहार ठप्प झाले आहे. कांदा प्रश्नावर सरकारच्यावतीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्याप तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, या मुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर हल्ला चढवला. सरकारने आज कांदा निर्यात शुल्क वाढीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांनी आज (ता. २६) दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी महिला आरक्षणाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य आणि कांदा निर्यातशुल्क या मुद्यांवर भाष्य केले.

पवार म्हणाले, `` केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले. हे शुल्क खूप जास्त आहे. वास्तविक कांदा निर्यातीवर शुल्क लावण्याची काहीही आवश्यकता नाही. हा निर्णय शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आहे.``

आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहामध्ये केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत राज्य सरकारची बैठक होणार असल्याचे मला सांगण्यात आले. कांद्यावरील निर्यातशुल्क मागे घेण्याचा निर्णय आजच घ्यावा, अशी आपली मागणी आहे, असे पवार यावेळी म्हणाले.

शेतीमालाच्या निर्यातीच्या संदर्भात भारताचे धोरण धरसोडीचे असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात आपली प्रतिमा बेभरवशाचा देश अशी झाली आहे. बांगलादेश, श्रीलंका यासारख्या शेजारी देशांना आपल्या धोरणाचा फटका बसतो. निर्यातीच्या धोरणात सातत्य असले पाहिजे, असे पवार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT