Department Of Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : सर्वसाधारण बदल्यांसाठी एक महिन्याची मुदतवाढ

Team Agrowon

Pune News : कृषीसह राज्याच्या सर्वच खात्यातील सर्वसाधारण बदल्यांसाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत बदल्या होऊ शकतील, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

सामान्य प्रशासन विभागाच्या कक्ष अधिकारी विद्या भोईटे यांनी सर्वसाधारण बदल्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देणारा आदेश जारी केला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाला केवळ एक दिवसाचा संचालक दिल्यामुळे कृषी आयुक्तालयात आश्‍चर्य व्यक्त केले गेले आहे.

औरंगाबादचे कृषी सहसंचालक दिनकर जाधव यांना निवृत्तीच्या दिवशीच संचालकपद दिले गेले. निवृत्त होत असल्याचे माहीत असूनही केवळ एका दिवसासाठी मंडळावर संचालक म्हणून नियुक्ती करीत पुन्हा पद रिक्त ठेवल्याबद्दल मंडळाचे कर्मचारी संभ्रमात पडले आहेत.

राज्यात काही उपविभागीय कृषी अधिकारी (एसडीएओ) व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या (एसएओ) बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे (कंसात बदलीनंतर मिळालेले पदनाम व ठिकाण) ः

चंद्रपूरचे एसएओ भाऊसाहेब बऱ्हाटे (एसएओ, नांदेड), लातूर एसएओ दत्तात्रेय गावसाने (एसएओ सोलापूर), वर्धा आत्मा प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर (प्राचार्य, रामेती, नागपूर),

नागपूर रामेतीच्या प्राचार्य डॉ. अर्चना कडू (आत्मा प्रकल्प संचालक, नागपूर), धाराशिव आत्मा प्रकल्प संचालक जितेंद्र शिंदे (आत्मा प्रकल्प संचालक, जालना), कृषी उपसंचालक कैलास शिरसाट (कृषी विकास अधिकारी,

जिल्हा परिषद, नाशिक), पालघरचे कृषी विकास अधिकारी सूरज जगताप (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव), माजलगाव उपविभागीय कृषी अधिकारी सूरज मडके (उपविभागीय कृषी अधिकारी, पुणे).

जळगाव कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे (उपसंचालक, गुणनियंत्रण, कृषी आयुक्तालय), वर्धा कृषी विकास अधिकारी अभय चव्हाण (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर),

डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे प्रकल्प व्यवस्थापक आरिफ शाह (उपविभागीय कृषी अधिकारी, नागभीड),

हिंगोली आत्मा प्रकल्प उपसंचालक युवराज शहारे (उपसंचालक, नागपूर), पांढरकवडा उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड (उपविभागीय कृषी अधिकारी,यवतमाळ),

परभणी विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी दत्तकुमार कळसाईत (उपविभागीय कृषी अधिकारी, नांदेड), पुणे आत्मा प्रकल्प संचालक पुनम खटावकर (उपसंचालक, शेतकरी मासिक),

वर्धा उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत (आत्मा प्रकल्प संचालक, भंडारा), पुणे कृषी आयुक्तालयातील संनियंत्रण उपसंचालक विठ्ठल कर्डिले (उपसंचालक, कृषिगणना कक्ष),

जळगाव विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी हितेंद्र सोनवणे (आत्मा प्रकल्प संचालक, रत्नागिरी), अकोला बीज प्रक्रिया यंत्रणेचे सहसंचालक विलास रेणापूरकर (वरिष्ठ मूल्य साखळी, स्मार्ट, पुणे).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT