Ground Water Level
Ground Water Level  Agrowon
ताज्या बातम्या

Ground Water Level : यवतमाळ जिल्ह्यातील भूजलपातळीत एक फुटाची वाढ

Team Agrowon

यवतमाळ : यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पर्जन्यवृष्टी (rain ) झालेली आहे. त्यामुळे भूजलपातळीत (Ground Water Level ) २.९१ मीटर म्हणजे जवळपास एक फुटाची वाढ झालेली आहे. मुबलक पाणी असल्याने यंदा रब्बीच्या पेरणीवर (Rabbi Sowing) जोर दिला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असून, पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे.

यंदा जिल्ह्यावर वरुणराजा चांगलाच मेहरबान झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस कोसळला आहे. या वेळी ऑक्टोबरपर्यंत पावसाचे आगमन झाले आहे. या पावसाने प्रकल्प भरले आहेत. त्यांचा फायदा झाला आहे. दरवर्षी वजा असणारी भूजलपातळी यंदा अधिक आली आहे. जिल्ह्यात २.९१ मीटर म्हणजेच जवळपास एक फुटाची वाढ झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे.

जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ९८६ मिमी आहे. ती सरासरी यंदा जिल्ह्यात पूर्ण झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाला आहे. परतीच्या पावसाने काही जिल्ह्यांत ढगफुटीसारखा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता रब्बी पिकांना या भूजलपातळी वाढल्याचा मोठा फायदा होणार आहे. टँकरवर अवलंबून राहणाऱ्या गावांची संख्या तुरळक राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक भूजलपातळी मारेगाव तालुक्यात ४.७३ मीटरने वाढली आहे. सर्वांत कमी १.२८ मीटरची वाढ झरी जामणी तालुक्यात नोंदविण्यात आली आहे.

तालुकानिहाय भूजलपातळी

आर्णी - २.७३, बाभूळगाव-२.६१, दारव्हा-३.००, दिग्रस-३.६६, घाटंजी-२.८२, कळंब-२.८७, महागाव-४.२१, मारेगाव-४.७३, नेर-१.९७, केळापूर-२.६४, पुसद-१.८८, राळेगाव-२.९०, उमरखेड-२.५४, वणी-३.८९, यवतमाळ-२.८७, झरी जामणी-१.२८ मीटरची वाढ झाली आहे.़

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT