Sugar Production Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing : एक कोटी ६० लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध

साधारणपणे ७६.९३ प्रतिहेक्टरी उत्पादकता ग्रहित धरुन १ कोटी ८१ लाख ५५ हजार टन ऊस उत्पादित होईल. त्यातील १५ टक्के ऊस विविध कारणाने कमी करून १ कोटी ६० लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार असल्याचा अंदाज आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर : नगर विभागात यंदा दोन लाख ३४ हजार ५३३ हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. साधारणपणे ७६.९३ प्रतिहेक्टरी उत्पादकता ग्रहित धरुन १ कोटी ८१ लाख ५५ हजार टन ऊस उत्पादित होईल. (Sugar Mills) त्यातील १५ टक्के ऊस विविध कारणाने कमी करून १ कोटी ६० लाख टन ऊस गाळपासाठी (Sugarcane Crushing) उपलब्ध होणार असल्याचा अंदाज आहे.(Sugar Production)

नगर जिल्ह्यात १ कोटी ३६ लाख ३५ हजार टन ऊस असेल, असे सांगण्यात आले. नगर विभागात नगर जिल्ह्यात २३ तर नाशिक जिल्ह्यात ५ असे २८ साखर कारखाने आहेत. त्यात १८ सहकारी तर १० खासगी साखर कारखाने आहेत. यंदा विभागात २ लाख ३४ हजार ५३३ हेक्टरवर ऊस गाळपासाठी उभा आहे.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने निश्चित केलेल्या हेक्टरी ७६.९३ टन उत्पादकतेनुसार १ कोटी ८१ लाख ५५ हजार ऊस उपलब्ध होईल. साखर कारखान्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारा, बेणे, रसवंती आदींसाठी साधारण १५ टक्के म्हणजे ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपातून कमी होईल.

लवकरच गाळप हंगामाबाबत बैठक होईल.

अतिरिक्त ऊस होईल का ?

नगर विभागात गतवर्षीच्या हंगामात सुरवातीच्या काळात साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्राएवजी बाहेरच्या कार्यक्षेत्रातील ऊस आणला. नंतर मात्र कार्यक्षेत्रातच ऊस अतिरिक्त झाला. ऊसतोडणीचा कालावधी संपून गेला तरी चार ते पाच महिने ऊस तोडणी करण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागली.

पैसे द्यावे लागले. ऊस उत्पादनातून नव्हे तर ऊसतोडणीसाठी द्यावे लागणाऱ्या पैशातून मोठी आर्थिक उलाढाल झाली. यंदाही उसाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होणार नाही ना, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT