Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : विमा कंपन्यांकडे दीड लाख शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तक्रारी

सोलापूर जिल्ह्यात यंदा ऑगस्ट ते ऑक्टोबर असे सलग तीन महिने पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीपोटी विमा कंपन्यांकडे सुमारे १ लाख ६३ हजार १७८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदा ऑगस्ट ते ऑक्टोबर असे सलग तीन महिने पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान (Kharif Crop Damage) झाले. या नुकसानीपोटी विमा कंपन्यांकडे (Crop Insurance Company) सुमारे १ लाख ६३ हजार १७८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १३ हजार ४८६ तक्रारी फेटाळण्यात आल्या आहेत. मदतीसाठी पात्र उर्वरित तक्रारीवर सर्वेक्षण सुरु असल्याचे सांगण्यात आले. पण हे सर्वेक्षण कधी संपणार, मदत नेमकी कधी आणि किती मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

सोलापूर जिल्हा हा रब्बीचा म्हणून ओळखला जातो. पण खरीप हंगामातही मोठ्या प्रमाणात पिके होतात. प्रामुख्याने सोयाबीन, तूर, मूग, मटकी, उडीद ही पिके घेतली जातात. पण यंदा सुरवातीला दोन महिने पावसाने पाठ फिरवली, पण नंतर ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात अतिवृष्टी आणि संततधारेने पिकाचे मोठे नुकसान केले.

आधीच्या पंचनाम्यात आणि मदतीचे काम होईपर्यंत पुढे नुकसान वाढतच गेले. त्यामुळे कृषी आणि महसूल विभागाचीही चांगलीच धावपळ उडाली. तर दुसरीकडे विमा कंपन्यांकडेही शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या. या तीन महिन्यात जवळपास १ लाख ६३ हजार १७८ पर्यंत पोचली. त्यातील १३ हजार ४८६ तक्रारी फेटाळण्यात आल्या.

उर्वरित तक्रारींपैकी १ लाख ४६ हजार ८१८ तक्रारी मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. त्या तक्रारींच्या सर्वेक्षणाचे काम सध्या सुरु आहे. त्यापैकीही जवळपास १ लाख ३४ हजार ६५३ तक्रारींचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित तक्रारींवर काम सुरु आहे. पण नेमके हे काम कधी संपणार आणि मदत कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पंधरवड्यात पैसे मिळतील

कृषी विभागानेही संबंधित विमा कंपनीला विम्याचे पैसे देण्याबाबत सूचना दिली आहे. तर विमा कंपनीनेही येत्या १५ दिवसात याबाबतची सर्व प्रक्रिया पार पाडून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केली जातील, असे आश्वासन दिले आहे. प्रामुख्याने उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी या तालुक्यातील तक्रारींचा त्यात अधिक समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT