Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Free Electricity : मोफत वीजेसाठी दीड लाख कोटी लागतील

तेलंगाना राष्ट्र समिती पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले. यातून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय राजकारणाचे सकेंत दिले आहेत.

टीम ॲग्रोवन

हैदराबादः केंद्रात सत्तेत आल्यानंतर देशभरातील शेतकऱ्यांना मोफत वीज (Free Electricity) देण्यात येईल. त्यासाठी केवळ १ लाख ४५ हजार कोटी खर्च येईल. काॅर्पोरेट कंपन्यांच्या बुडीत १२ लाख कोटींपेक्षा ही रक्कम खूपच कमी आहे, असे तेलंगणाचे मुख्यमंत्री (Telangana Chief Minister) के चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी स्पष्ट केले.

तेलंगाना राष्ट्र समिती पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले. यातून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय राजकारणाचे सकेंत दिले आहेत. पक्षाच्या नावात बदल केलेला असला तरी पक्षाच्या चिन्हात काहीही बदल केलेला नाही, असे तेलंगणाचे मंत्री ई दयाकर राव यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले की, शेतकऱ्यांन्ना मोफत वीज हा प्रश्न पक्षासाठी केंद्रबिंदू राहील. केंद्रात भाजपा विरहीत सरकार स्थापन झाल्यास संपूर्ण देशातील शेतकऱ्यांन्ना मोफत वीज देण्याचे आश्वासन राव यांनी यापुर्वीच दिले आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री राव म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी फक्त १ लाख ४५ हजार कोटी खर्च येईल.

काॅर्पोरेट कंपन्यांच्या बुडीत १२ लाख कोटींपेक्षा ही रक्कम खूपच कमी आहे. विविध राज्यांमधील शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा झालेली आहे. या चर्चेतुन राष्ट्रीय शेतकरी मंच स्थापन करण्याचे ठरले आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) व संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) यांच्याकडे नदीतील पाण्याच्या योग्य वापराविषयी काहीही दुरदृष्टी नाही. भारत राष्ट्र समितीने काही कल्याणकारी योजना सुरु केल्या. त्यात रयथू बंधू (Rythu Bandhu) गुंतवणूक समर्थन योजना व रयथू बंधू (Rythu Bima) आयुर्विमा योजना शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या आहेत. तसेच दलित बंधू योजना ज्यामध्ये १० लाख रुपये प्रत्येक भारतीय दलित कुटुबांला देण्यात येणार आहे, असंही राव यांनी यावेळी सांगितले.

२०१७ मध्ये अनुसुचित जमाती कोटा ६ टक्क्यांवरुन १० टक्के करण्याचे विधेयक विधिमंडळात मंजूर करुन राष्ट्रपतींच्या संमतीकरिता पाठविण्यात आले. पण केंद्र सरकारकडून हे विधेयक नामंजूर करण्यात आल्याचंही राव यांनी स्पष्ट केलं. यावेळी तेलंगणाच्या मंत्री सत्यावथी राठोड यांनी राज्य सरकार अशाच कल्याणकारी योजना संपूर्ण भारतभर राबवण्याची आमची आकांक्षा असल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT