राजू शेट्टी Agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetty : काटा मारणाऱ्या कारखानदारांचा ‘काटा’ काढू : राजू शेट्टी

वर्षाला सुमारे ४५०० कोटींचा दरोडा टाकणाऱ्या ऊस कारखानदारांना यावर्षी त्यांचाच ‘काटा’ काढल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

टीम ॲग्रोवन

सरुड, जि. कोल्हापूर : सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या उसावर (Sugar Crop) काटामारीतून वर्षाला सुमारे ४५०० कोटींचा दरोडा टाकणाऱ्या ऊस कारखानदारांना (Sugar Mills) यावर्षी त्यांचाच ‘काटा’ काढल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी दिला. येथे स्वाभिमानी शेतकरी (Swabhimani Shetkari) संघटनेच्या एकरकमी एफआरपीच्या जागर यात्रेच्या प्रारंभ सभेत ते बोलत होते.

स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सुरेश म्हाकटकर यांनी स्वागत केले.

श्री. शेट्टी म्हणाले, की एकरकमी एफआरपी मिळणे, हा शेतकऱ्यांचा हक्क आहेच पण गेल्यावर्षीचे एफआरपी अधिक २०० रुपये साखर कारखानदारांच्या मानगुटीवर असून घेतल्याशिवाय राहणार नाही.

महाविकास आघाडीने केंद्राच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे एफआरपीचे तुकडे पाडले, पण यांना तोंडावर पाडल्याशिवाय स्वस्थ करणार नाही. ते पुढे म्हणाले, खताचे दर गगनाला भिडले आहेत. उत्पादन खर्च वाढला आहे.

इथेनॉलच्या नव्या धोरणामुळे व कारखान्यातल्या उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे. यावर्षी १०० लाख टन साखर निर्यात झाली आहे. त्यामुळे कारखानदारांकडे बक्कळ पैसा आहे. मग शेतकऱ्यांना जादाचे पैसे का देत नाही, असा सवाल उपस्थित होतो.

त्यांनी हे सुखासुखी मिळत नसेल तर नरड्यावर बसून घेऊ यासाठी शेतकऱ्यांनी संघर्षाची तयारी ठेवावी. या वेळी भाई भारत पाटील, संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष अजित पवार, अमर पाटील, मानसिंग पाटील यांची भाषणे झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT