MAFSU Agrowon
ताज्या बातम्या

MAFSU : कुलगुरुपद निवडीत ‘माफसू’च्या उमेदवारासाठी नियमांचा अडसर

MAFSU Vice Chancellor : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत कुलगुरू पदाच्या निवडीतून ‘माफसू’च्या आठही उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले.

Team Agrowon

Nagpur News : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत कुलगुरू पदाच्या निवडीतून ‘माफसू’च्या आठही उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. कुलगुरुपदासाठीची अर्हता पूर्ण करू शकत नसल्याच्या कारणावरून हे अर्ज फेटाळण्यात आले. परंतु ‘माफसू’मध्ये विविध पदाचा कार्यकाळ तीन वर्षांचाच निर्धारित असल्याने हे शक्‍य नाही. सोबतच पदेही मंजूर नाहीत. परिणामी या उमेदवारांचा पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांचा कार्यकाळ जानेवारी २०२३ मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर नव्या कुलगुरूच्या निवडीसाठी जाहिरात प्रसिद्ध करून चार एप्रिलपर्यंत अर्ज मागण्यात आले होते. त्यानुसार ‘माफसू’च्या आठ उमेदवारांसह तब्बल २० जणांनी अर्ज केले. मात्र अर्हता पूर्ण करीत नसल्याच्या कारणावरून ‘माफसू’च्या आठही जणांचे अर्ज बाद करण्यात आले. याच उमेदवारांनी आता राज्यपाल कार्यालयाला पत्र लिहीत अर्हता पूर्ण करण्यातील अडचणीची मांडणी केली आहे.

राज्यपालांना लिहिलेल्या पत्रानुसार, ‘माफसू’च्या सर्व महाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता संचालक ही पदे पाच ऐवजी केवळ तीन वर्षे कालावधीची आहेत. परिणामी, त्यांना एकाच पदावर पाच वर्षाचा प्रशासकीय अनुभव मिळू शकत नाही. इतकेच नाही तर माफसू किंवा त्यांच्या कोणत्याही घटक महाविद्यालयात विभाग प्रमुखाचे पदच मंजूर नाही.

विद्यापीठ संबंधित विषयातील सर्व ज्येष्ठ प्राध्यापकांना विभाग प्रमुख किंवा विद्यापीठाचे प्राध्यापक म्हणून अधिसूचित करते, जे विद्यापीठाचे अध्यक्ष आहेत. हे कार्यात्मक पद असले तरी ‘माफसू’मध्ये विभाग प्रमुखाचे कोणतेच पद मंजूर नाही. असे असले तरी कायद्यानुसार विद्यापीठातील प्राध्यापक आणि विभागप्रमुख ही पदे समतूल्य आहेत, ही बाब विचारात घ्यावी.

१५ वर्षांहून अधिक शिक्षण, संशोधन आणि विस्ताराचा अनुभव असलेल्या या वरिष्ठ प्राध्यापकांनी अतिरिक्‍त कार्यभार सांभाळला आणि कर्तव्य पार पाडली. २०१७ मध्ये या सर्व मुद्यांचा विचार करून ‘माफसू’मधील अनेक अर्जदारांना वैयक्‍तिक संवादासाठी बोलावण्यात आले. परंतु, या वेळी मात्र या तथ्यांचा विचार केला नाही. परिणामी शोध समितीच्या निदर्शनासही बाब आणून द्यावी, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

दोष नसताना अपात्र

सहयोगी अधिष्ठाताची सर्व पदे दीर्घकाळापासून रिक्‍त आहेत. वरिष्ठ प्राध्यापक प्रभारी म्हणून ते सांभाळत आहेत. अधिष्ठाता आणि संचालकांची पदे देखील रिक्‍त होती. ती केवळ ऑगस्ट २०२१ मध्ये भरली गेली. त्यामुळे ‘माफसू’च्या कोणत्याही प्राध्यापकांना पाच वर्षांचा विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता किंवा विद्यापीठ अधिष्ठाता आणि संचालक पदाचा अनुभव घेता येत नाही. यात त्यांचा कोणताही दोष नसताना अपात्र ठरविण्यात आले आहे, असे ‘माफसू’च्या उमेदवारांनी पत्रात नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT