Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा भरणाऱ्यांमध्ये बिगर कर्जदार शेतकरी अर्जांची संख्या जास्त

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यांत मंगळवार (ता. २५) पर्यंत एकूण १० लाख ६६ हजार ९५ शेतकऱ्यांनी पीकविमा अर्ज भरले आहेत.

या दोन जिल्ह्यांमध्ये पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये बिगर कर्जदार शेतकरी अर्जांची संख्या जास्त आहे. आजवर बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे १० लाख ५५ हजार ९५१ अर्ज व कर्जदार शेतकऱ्यांचे १० हजार १४४ पीकविमा अर्ज आहेत.

या शेतकऱ्यांनी एकूण ६ लाख ८१ हजार ८८१ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षक कवच घेतले आहे. गतवर्षीच्या (२०२२) तुलनेत परभणी जिल्ह्यात ९६.१४ टक्के तर हिंगोली जिल्ह्यात १०८.१६ टक्के पीकविमा अर्ज आले आहेत. परभणी जिल्ह्यात मंगळवार (ता. २४) पर्यंत कर्जदार ३ हजार ६९५ व बिगर कर्जदार ६ लाख ४२ हजार २७२ शेतकरी मिळून एकूण ६ लाख ४५ हजार ९६७ शेतकऱ्यांनी पीकविमा अर्ज दाखल केले आहेत.

या शेतकऱ्यांनी ४ लाख १८ हजार ६२८ हेक्टरवरील पिकांसाठी २ हजार १८३ कोटी २३ लाख रुपये एवढ्या विमा रकमेचे संरक्षण घेतले आहे. शेतकऱ्यांनी प्रतिअर्ज १ रुपयानुसार ६ लाख ४५ हजार ९४४ रुपये विमा हप्ता भरला आहे.

राज्य शासनाच्या हिश्याचा ३३६ कोटी ५७ लाख रुपये व केंद्र शासनाच्या हिश्याचा २८२ कोटी ९ लाख रुपये मिळून एकूण ६१८ कोटी ७२ लाख रुपये विमा हप्ता आहे.

गतवर्षी (२०२२) पीकविमा योजनेत जिल्ह्यातील ६ लाख ७१ हजार ८९७ शेतकरी सहभागी होते. यंदा आजवर संपूर्ण राज्यात पीकविमा योजनेतील एकूण सहभागी अर्जामध्ये परभणी जिल्ह्याचा वाटा ५.८२ टक्के आहे.

हिंगोली जिल्ह्यात मंगळवार (ता. २५)पर्यंत कर्जदार ६ हजार ४४९ शेतकरी व बिगर कर्जदार ४ लाख १३ हजार ६७९ मिळून एकूण ४ लाख २० हजार १२८ शेतकऱ्यांनी पीकविम्याचे अर्ज दाखल केले आहेत. या शेतकऱ्यांनी २ लाख ६३ हजार २५३ हेक्टरवरील पिकांसाठी १ हजार ३८९ कोटी ९१ लाख रुपये एवढ्या विमा रकमेचे संरक्षण घेतले आहे.

शेतकऱ्यांनी प्रतिअर्ज १ रुपयानुसार ४ लाख २० हजार १२३ रुपये विमा हप्ता भरला आहे. राज्य शासनाच्या हिश्याचा १३८ कोटी ३१ लाख रुपये व केंद्र शासनाच्या हिश्याचा १०६ कोटी ७९ लाख रुपये मिळून एकूण २४५ कोटी १४ लाख रुपये विमाहप्ता आहे. गतवर्षी (२०२२) पीकविमा योजनेत एकूण ३ लाख ८८ हजार ४५७ शेतकरी सहभागी होते.

यंदा आजवर संपूर्ण राज्यात पीकविमा योजनेतील एकूण सहभागी अर्जामध्ये जिल्ह्याचा वाटा ३.७९ टक्के आहे. पीकविमा अर्जासाठी सोमवार (ता. ३१) पर्यंत अंतिम मुदत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT