Crop Dmaage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : नुकसान भरपाईबाबत अधिसूचना जारी

खरिप हंगाम २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत कृषी विभागाकडून सोयाबीन, कापूस, तूर व ज्वारी या चार पिकांचे ६० ते ६८ टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता.

टीम ॲग्रोवन

नांदेड : खरिप हंगाम २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) झाले होते. याबाबत कृषी विभागाकडून सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton), तूर व ज्वारी या चार पिकांचे ६० ते ६८ टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. यानुसार शेतकऱ्यांना नुकसानीच्या पंचवीस टक्के भरपाईसाठी (Crop Damage Compensation) जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी मंगळवारी (ता.१३) अधिसूचना जारी करून विमा कंपनीसह शासनाला कळविले आहे.

जिल्ह्यात जुलै व ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन खरिपातील पिकांसह बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात सात लाख शेतकऱ्यांचे सव्वापाच लाख हेक्टरवरील पिकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने राज्य शासनाला कळविला होता. याबाबत शासनाने शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी ७१८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. परंतु पीकविमा कंपनीकडून नुकसानीबाबत अग्रिम देण्याची मागणी जोर धरु लागली होती. याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी राज्य शासनाच्या अधिकाऱ्यामार्फत विमा कंपनीच्या माध्यमातून मंडळनिहाय नुकसानीचा अहवाल मागवून घेतला.

‘भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम खात्यात जमा करावी’

यात पीकविमा योजनेतंर्गत खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर व ज्वारी या पिकांचे उत्पादन हे त्या पिकांच्या सात वर्षातील सरासरी उत्पादनाच्या पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीला ही अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत या तरतुदीनुसार पात्र ठरलेल्या सोयाबीन, कापूस, तूर व खरीप ज्वारी या अधिसूचित पिकांकरिता महसूल मंडळातील सर्व पिकविमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी, असे निर्देश दिले आहेत.

नुकसान भरपाईबाबत शेतकऱ्यांना पिकांच्या संभाव्य नुकसानीच्या पंचवीस टक्के अग्रिम देण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील सर्वच मंडळातील सोयाबीन, कापूस, ज्वारी व तूर या पिकांच्या नुकसानीच्या पंचवीस टक्के अग्रिम भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रविशंकर चलवदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan : वर्धा जिल्ह्यात दुष्काळाचा पीककर्ज वाटपालाही फटका: रब्बी हंगामासाठी ७,६४५ शेतकऱ्यांना १२१ कोटींचे कर्जवाटप

Sustainable Farming : खानदेशात मोठा कृषी बदल: रासायनिक तणनाशकांचा वापर ३० टक्क्यांनी घटला

Rabi Season : खरिपानंतर आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचा मोठा फटका; पाण्याअभावी पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत!

Old Farm Pond Lining Approval : शेतकऱ्यांची मोठी मागणी: जुन्या शेततळ्यांचे अस्तरीकरण नव्याने करण्यासाठी अनुदानास मंजुरी द्या!

Tembhu Project : सांगलीच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा: 'ताकारी आणि म्हैसाळ' योजना सुरू, आता 'टेंभू'चे आवर्तन कधी?

SCROLL FOR NEXT