Potkharaba Land Agrowon
ताज्या बातम्या

Tribal Land Encroachment : आदिवासी जमिनीवरील अतिक्रमणप्रश्‍नी नोटिसा

आदिवासींच्या जमिनीवर केलेल्या अतिक्रमणप्रश्‍नी सुझलॉनसह राज्याचे मुख्य सचिव व जिल्हाधिकारी यांना अनुसूचित जनजाती आयोगाने नोटीस बजावली आहे. ३० दिवसांत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टीम ॲग्रोवन

नंदुरबार ः आदिवासींच्या जमिनीवर (tribal Land Encroachment) केलेल्या अतिक्रमणप्रश्‍नी सुझलॉनसह राज्याचे मुख्य सचिव व जिल्हाधिकारी यांना अनुसूचित जनजाती आयोगाने नोटीस बजावली आहे. ३० दिवसांत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नंदुरबार तालुक्यातील आदिवासींच्या जमिनीवर शासनाची पूर्वपरवानगी न घेता १५ ते १६ वर्षांपासून पवन ऊर्जा टॉवरमधून निर्माण होणाऱ्या विजेला वाहून नेण्यासाठी खांब, रस्ते, वीज जनित्र व कंपनीचे महाकाय ट्रॉली नेत इतर जमिनीचेही नुकसान झाले आहे. याप्रश्‍नी आदिवासी जमीन हक्क शेतकरी कामगार संघर्ष समिती लढा देत आहे. समितीने राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची दखल घेऊन नंदुरबार जिल्हाधिकारी, मुख्य सचिव तसेच सुझलॉन एनर्जी, पुणे यांचे महानिर्देशक यांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. या बाबत समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे यांच्या उपस्थितीत नवापूर चौफुली येथील देवमोगरा माता मंदिरात बैठक झाली.

श्री. रामराजे सचिव, भीमसिंग पाडवी, बापू भिल, नाना भिल, साहेबराव भिल, हिरामण भिल बळिराम, भिल अप्पा बैसाणे, प्रभात पाडवी, सुखदेव भिल व शेतकरी उपस्थित होते. आयोगाकडून आदिवासी शेतकरी यांना न्याय मिळाला नाही, तर राष्ट्रपतींना भेटणार असल्याचे श्री. रामराजे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

Onion Farmers Issue: ‘बफर स्टॉक’चा कांदा शेतकऱ्यांच्या मुळावर

Sugarcane Transport Rule: ऊस वाहतुकीमध्ये बैलांना क्रूर वागवू नका; साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

SCROLL FOR NEXT