Tribal Rights : आदिवासी कुटुंबांच्या न्याय हक्कासाठी सतत संघर्ष ः वळसे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व शाश्वत संस्थेच्या संस्थापक कुसुमताई कर्णिक यांचे वास्तव्य पुणे-मुंबईसारख्या शहरात होते.
Social Problems
Social ProblemsAgrowon
Published on
Updated on

मंचर, जि. पुणे ः ज्येष्ठ सामाजिक (Social ) कार्यकर्त्या व शाश्वत संस्थेच्या संस्थापक कुसुमताई कर्णिक (Kusumtai Karnik) यांचे वास्तव्य पुणे-मुंबईसारख्या शहरात होते. पण सामाजिक कार्याची जिद्द मनाशी बाळगून त्यांनी आंबेगाव व खेड तालुक्यांच्या डोंगरी दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांच्या (Tribal Family) न्याय हक्कासाठी सतत संघर्ष केला. शिक्षण, आरोग्य व हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल ४० वर्षे काम केले.

त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. यापुढेही गतिमान पद्धतीने त्यांनी सुरू केलेले कामकाज सुरू ठेवण्यासाठी शाश्वत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काम करावे. त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल,’’ अशी ग्वाही माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Social Problems
राज्यात Continuous Rain मुळे शेतीकामे ठप्प|Monsoon Update|Agrowon

मंचर (ता.आंबेगाव) येथील शरद पवार सभागृहात रविवारी (ता.६) कुसुम कर्णिक यांच्या निधनामुळे झालेल्या शोकसभेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक अभियंता दिलीप मेदगे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सुभाषराव मोरमारे, सौरभ कर्णिक/कपूर, संजय गवारी, प्रकाश घोलप, सुला गवारी उपस्थित होते. कुसुम कर्णिक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

वळसे पाटील म्हणाले, ‘‘भीमाशंकर राष्ट्रीय अभयारण्यामुळे आदिवासी गावे वाड्या-वस्त्यांचे विस्थापन होणार होते. अभयारण्याच्या विरोधात रणशिंग फुंकण्याचे काम सर्वप्रथम कुसुमताईंनी केले. त्यांना पती अभियंता (स्व) आनंद कपूर यांची मोलाची साथ मिळाली. त्यांनी मासेमारीचा ठेका आदिवासी सहकारी संस्थेमार्फत उपलब्ध करून दिला. अनेक समाजोपयोगी कामे त्यांनी केली.’’

मेदगे म्हणाले, ‘‘कुसुमताई यांची कार्यपद्धती मी जवळून पहिली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या सहकार्यातून शासनामार्फत पडकई योजना प्रकल्प प्रभावीपणे राबविला. त्यामुळे आदिवासींच्या जमिनी विकसित झाल्या.’’सौरभ कपूर म्हणाले, ‘‘कुसुमताई यांनी आदिवासी बांधवांसाठी सुरू केलेले काम सुरू ठेवले जाईल. याकामी सर्वांनी मला सहकार्य करावे.’’

शिवव्याख्याते गुलाबराव वळसे पाटील, कामगार नेते ॲड. बाळासाहेब बाणखेले, प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, डॉ. राम कटारिया, प्रतिभा तांबे, बुधाजी डामसे, डॉ. अमोल वाघमारे, डी. के. वळसे पाटील, अनुपमा पवार यांनी भावना व्यक्त केल्या. भीमा गवारी यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com