Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : कमी पीककर्ज देणाऱ्या बँकांना बजावली नोटीस

Kharif Crop Loan : खरीप पीक कर्जाच्या उद्दिष्टाच्या ५७ टक्के वितरण झाले असून, त्यात राष्ट्रीय व खासगी बँकांचा वाटा कमी आहे.

Team Agrowon

Amravati News : जिल्ह्यात खरीप पीक कर्जाच्या उद्दिष्टाच्या ५७ टक्के वितरण झाले असून, त्यात राष्ट्रीय व खासगी बँकांचा वाटा कमी आहे. त्यामुळे २० टक्क्यांहून कमी कर्ज वितरण करणाऱ्या सर्व बँकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावतानाच, येत्या पंधरवड्यात कामगिरी न सुधारल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिला.

खरीप पीककर्ज वितरण व पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत बँक अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूलभवनात झाली, त्या वेळी ते बोलत होते. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पंकजकुमार, कृषी अधिकारी गजानन देशमुख यांच्यासह सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते. येत्या खरीप हंगामासाठी १ हजार ४५० कोटी पीककर्जाचे उद्दिष्ट निश्चित आहे.

त्यात आजपर्यंत ५७ टक्के कर्जवितरण झाल्याचे दिसते. तथापि, या आकडेवारीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वाटा ८९ टक्के आहे. उर्वरित राष्ट्रीय व खासगी बँकांची कामगिरी समाधानकारक नाही. त्यात तत्काळ सुधारणा करून येत्या १५ दिवसांत अधिकाधिक कर्जवितरण करून उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

पीककर्ज वितरणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, की कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ असावी. शेतकरी बांधवाची अडवणूक होता कामा नये.

अर्ज प्रलंबित ठेवू नयेत. त्यात त्रुटी असल्यास पूर्तता करून घ्यावी. अनावश्यक कागदपत्रे मागू नयेत. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन संवेदनशीलता बाळगून त्यांना कर्ज मिळण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Zilla Parishad elections: अहिल्यानगर ‘झेडपी’ची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Crop Loan: किसान क्रेडिट कार्डचे एक हजार पीककर्ज प्रस्ताव मंजूर करा: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Manjara Dam: ‘नॅचरल’च्या वतीने मांजरा धरणातील पाण्याचे जलपूजन

Bioenergy Award: विस्मा तर्फे ‘श्री गुरुदत्त’ला उत्कृष्ट बायोएनर्जी उत्पादक पुरस्कार

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार: अध्यक्ष मानसिंगराव नाईक

SCROLL FOR NEXT