Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढणार

विदर्भ, मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान झाले आहे. रविवारी (ता. २६) सकाळपासून उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला होता. दुपारनंतर अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.

Team Agrowon

पुणे : मॉन्सूनच्या पावसाला पोषक वातावरण असल्याने कोकणात (Kokan) पावसाची संततधार सुरू आहे. आज (ता. २७) उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), विदर्भात (Vidarbha) पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर उर्वरित राज्यातही हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात ढगांची दाटी वाढत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातही ढगांचे अच्छादन वाढले आहे. विदर्भ, मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान झाले आहे. रविवारी (ता. २६) सकाळपासून उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला होता. दुपारनंतर अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. आज (ता. २७) दक्षिण कोकणातील रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ कायम आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत पश्चिम किनाऱ्याला समांतर असलेल्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर कोकण आणि दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून छत्तीसगड मधील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. राजस्थान आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

कोकण : रत्नागिरी.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

कोकण : रायगड, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नगर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली.

विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी २० जून रोजी संपूर्ण पूर्व भारत व्यापून उत्तर भारतातील राज्यांमध्ये प्रगती केली. संपूर्ण आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल मॉन्सूनने व्यापला आहे. बिहार, झारखंड, मध्य प्रदेशचा बहुतांश भाग, उत्तर प्रदेशच्या काही भागात मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर मात्र मॉन्सूनने पुढे वाटचाल केलेली नाही. मॉन्सूनच्या प्रगतीस अनुकूल वातावरण झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण मध्य प्रदेश, बिहारसह, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड राज्यात प्रगती होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Samruddhi Scheme : कृषी समृद्धी योजनेंतर्गत ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र आणि बीबीएफ यंत्रासाठी मिळणार अनुदान; शासन निर्णय जारी

Hawaman Andaj : राज्यात थंडीची चाहूल; काही भागात दुपारी उन्हाचा चटकाही वाढला

Paddy Crop Damage: सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिपक्व ४० टक्के भातपिकाचे नुकसान

Fallow Land Sowing: नापेर क्षेत्रात कोरडवाहू दादर ज्वारी, हरभऱ्याची पेरणी 

Manoj Jarange Vs Dhananjay Munde: धनंजय मुंडे पृथ्वीतलावावर नसावा, असं जरांगेंना वाटतं, मुंडेंचे प्रत्युत्तर, सीबीआय चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT