Neera Devghar Dam Agrowon
ताज्या बातम्या

Neera Devghar Dam : ‘नीरा देवघर’च्या पाचशे कोटींच्या कामांना लवकरच सुरवात

Team Agrowon

Solapur News : दुष्काळी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील नीरा देवघर कालव्यांच्या कामांना लवकरच सुरवात होणार आहे. या कामाची निविदा येत्या पंधरादिवसात निघणार आहे, नीरा देवघरच्या एकूण पाचशे कोटींच्या कामांना पुढील महिन्यात सुरवात होईल, अशी माहिती माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिली.

माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी (ता. २) पुणे येथे सिंचनभवन येथे मतदार संघातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये नीरा देवधर कालव्यांच्या कामांचा आणि पाणी वाटपाचा आढावा घेण्यात आला. बैठकीत माळशिरस तालुक्यातील नीरा देवघर कालव्यांची कामे लवकरच सुरु केली जाणार आहेत. या कामाची निविदा लवकरच प्रसिद्ध होईल असेही खासदार निंबाळकर यांनी सांगितले.

या बैठकीला सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, माणचे आमदार जयकुमार गोरे,आमदार संजय शिंदे. दीपक चव्हाण, गणेश चिवटे, चेतनसिंह केदार के. के. पाटील, बाळासाहेब सरगर, सोपान नारनवर, दत्तात्रय मोरे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

निंबाळकर म्हणाले, की गेल्या तीन वर्षापासून नीरा देवधर लाभक्षेत्रातील वितरण नलिकेची कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरु होता. या कामाला आता यश आले.

त्यानुसार ६५ ते ८७ किलोमीटर पर्यंतच्या कामाच्या निविदा येत्या १५ दिवसात निघणार आहेत, त्यानंतर पुढील महिन्यात निरा -देवघरच्या एकूण ५०० कोटी रुपयांच्या कामांना सुरवात होईल. यामध्ये माळशिरस पर्यंतच्या वितरण नलिकेची कामे पूर्ण केली जाणार आहेत.

यामुळे नीरा देवघरच्या पाण्यापासून वंचित असलेल्या माळशिरस तालुक्यातील १२ गावांनाही यातून पाणी मिळणार आहे. पंढरपूर आणि सांगोला तालुक्याला मिळणाऱ्या पाणी वाटपाचा नव्याने आराखडा तयार करण्याच्या सूचनाही पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.

नीरा देवधर बरोबरच फलटण तालुक्याला धोमबलकवडी धरणातील अतिरिक्त ०.९३ टीएमसी पाणी मिळणार आहे. सोळशी व शिवथरघळ येथून नीरा देवघर धरणातून माण, फलटण, सांगोला तालुक्यांना पाणी मिळणार आहे. या योजनेचा ड्रोन सर्वे करण्यात आला आहे. या योजनेचा अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांसह लवकरच बैठकीसाठी प्रयत्न

माढा लोकसभा मतदार संघातील अनेक सिंचन योजनांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भरपूर निधी मंजूर केला आहे. उर्वरित प्रकल्पांना शासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी लवकरच मतदार संघातील एक शिष्टमंडळ घेऊन मंत्रालयात बैठक लावणार आहे. याबरोबरच कृष्णा भीमा स्थिरीकरणासह इतर छोट्यामोठ्या प्रकल्पाची कामे आगामी तीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

बैठकीत चर्चा झालेले मुद्दे आणि निर्णय

धोम बलकवडी व नीरा देवघर कालवा जोड प्रकल्पाची निविदा पंधरा दिवसात निघणार

जिहे कटापूर योजनेत नवीन ४६ गावांचा समावेश करण्याची आमदार जयकुमार गोरे यांची मागणी

सांगोला उपसासिंचन योजनेच्या कामाला लवकरच सुरवात

टेंभू प्रकल्पातून मिळणाऱ्या अतिरिक्त दोन टीएमसी पाण्याचे नियोजन केले जाणार.

दोन टीएमसी पैकी ०.०६ टीएमसी पाणी वर्षातून दोन वेळा माण नदीत सोडून तालुक्यातील बंधारे भरून घेण्याचा निर्णय

तिसंगी-सोनके, बुध्देहाळ, चिंचोली आदी तलाव भरून घेण्या संदर्भात संबंधित विभागाला सूचना

पाण्यापासून वंचित असलेल्या सांगोला तालुक्यातील इतर गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश करण्याचा प्रस्ताव तयार करून शासन मान्यतेसाठी पाठवण्याचा सूचना

माढा तालुक्यातील तुळशी, बावी, मानेगाव, खैराव या पाणी योजनांची कामे लवकर पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

करमाळा तालुक्यातील मांगेवाडी तलावाचा कुकडी प्रकल्पात समावेश करण्याच्या सूचना, तसा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT