Natural Farming
Natural Farming Agrowon
ताज्या बातम्या

Natural Farming : जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक शेती उपयुक्त

Team Agrowon

Dhule News धुळे ः शेतीचा उत्पादनाचा खर्च (Agriculture Production Cost) कमी करणे, जमिनीची सुपीकता टिकून ठेवणे गरजेचे आहे. तसेच विषमुक्त अन्न उत्पादनासाठी नैसर्गिक शेती (Natural Farming) ही काळाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक झाले आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्र, बाजरा संशोधन केंद्र व कृषी विभाग, धुळे यांच्यातर्फे कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण झाले. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर अध्यक्षस्थानी होते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शांताराम मालपुरे प्रमुख मार्गदर्शक होते. केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल देसले, नाबार्डचे प्रबंधक नेकीचंद सूर्यवंशी, बाजरा पैदासकार डॉ. खुशाल बऱ्हाटे, ॲड. प्रकाश पाटील, प्रगतिशील शेतकरी वाल्मीक सोनवणे, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष दिलीप पाटील, श्रीराम पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. देवकर म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून केव्हीकेचे काम स्तुत्य आहे. आठवड्यातून एकदा पौष्टिक तृणधान्याचा आपल्या आहारात समावेश करावा. जमिनीचा सेंद्रिय कर्ब टिकवून ठेवावा.’’

‘आत्मनिर्भर व्हा’

मालपुरे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी तृणधान्य पिकांची लागवड करून केव्हीकेत त्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर व्हावे, असा सल्ला मालपुरे यांनी दिला.

डॉ. बऱ्हाटे यांनी यांनी बाजरी पिकाचे आहारातील महत्त्व सांगितले. सोनवणे यांनी नैसर्गिक शेतीचे अनुभव, शेतकरी दिलीप पाटील यांनी सेंद्रिय शेती काळाची गरज, कृषिभूषण श्रीराम पाटील यांनी बाजरी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electric Tractor : इलेक्ट्रिक ट्रॅक्टर जरूर आणा, पण...

Animal Ear Tagging : मे अखेरपर्यंत करावी जनावरांची इअर टॅगिंग

Mahavitran Chatbot Service : ‘महावितरण’ची ग्राहकांसाठी २४ तास ‘चॅटबॉट’ सेवा

Tomato Cultivation : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात टोमॅटो लागवडीला वेग

Turmeric Seed : छत्तीसगडला ‘एमपीकेव्ही’च्या हळद बियाण्याची भुरळ

SCROLL FOR NEXT