Electricity : शेतकऱ्यांना १२ तास दिवसा वीज द्या

मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांच्या नेतृत्वात महावितरण नागपूर मंडळाचे मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
Electricity Bill
Electricity BillAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : शेतकऱ्यांना बारा तास रात्री नव्हे तर दिवसा वीज द्या, थकीत वीजबिलासाठी (Electricity bill) कोणाचाही विद्युत पुरवठा (Electricity Supply) खंडित करून नका अशा मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आल्या असून, याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांच्या नेतृत्वात महावितरण नागपूर मंडळाचे मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी ओल्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात आहेत त्यात वीजपुरवठा कापल्यास त्याच्यावर आत्महत्येची वेळ येऊ शकते. तसेच याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची असेल असा इशाराही देण्यात आला.

Electricity Bill
Agriculture Electricity : धारूळ रामापूर विद्युत उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करा

या शिष्टमंडळात आदित्य दुरुगकर यांच्यासह रितेश कान्होलकर, प्रभारी जिल्हाध्यक्ष सचिन चिटकुले, काटोल प्रभारी तालुकाध्यक्ष अनिल नेहारे, प्रभारी तालुका अध्यक्ष नागपूर ग्रामीण दीपक ठाकरे, प्रभारी तालुका अध्यक्ष नरखेड साहील ढोकणे, तालुका अध्यक्ष नरखेड महिला सेना, स्वाती जैस्वाल, तालुका अध्यक्ष काटोल, वैष्णवी चिंचाळकर, उपसरपंच आग्राचे चेतन गुडधे, राहुल वेले, आश्‍विन पुंडे, आशिष पाटील सहभागी होते.

तसंच राजू राऊत, अनिल शिंदे, दीपक वेडे, पुंडलिक साबडे, भरत साबडे, राकेश चौधरी, प्रीतम कम्पल्लीवार, आश्‍विन रामटेके, राकेश वानखेडे, तुषार भुंबर, प्रणय वरठे, श्रेयश खुजे, योगेश कोडापे, भारत धोटे, शुभम वानखेडे, पीयूष परतेकी, चिंटू नखेडे, सूरज कोडापे, रितिक कठाने, साहील संतपे, अमोल नारनवरे, नितीन पुसतकर, राहुल धामणकर, राहुल बारई, तेजस कोरडे, पुरुषोत्तम उदनारे, मनीष खरपुरिया, रोहित खरपुरिया, रितेश भारसकरे, मयूर मापले, लोकेश नागोसे, संजय परतेती, कृष्‍णा ठाकरे, जितेंद्र कडवदे, सुनील आहाके, अतुल वानखेडे, सुशील मानवटकर, मुकुंद कुरुडे, अर्चित ठवले, सिकंदर सोळंके, विशाल शेळामे, संदीप भोस्कर, अनिल पुंडळकर यांचा समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com