Indian Farmer Agrowon
ताज्या बातम्या

तासगावात आजपासून राष्ट्रीय बळीराजा साहित्य संमेलन

‘‘राजर्षी शाहू जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसीय पहिले राष्ट्रीय बळीराजा साहित्य संमेलन तासगाव येथे आजपासून सुरू होत आहे.

टीम ॲग्रोवन

सांगली ः ‘‘राजर्षी शाहू जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसीय पहिले राष्ट्रीय बळीराजा साहित्य संमेलन (Baliraja Sahitya Sammelan) तासगाव येथे आजपासून सुरू होत आहे. संमेलनाचे अध्यक्ष शेतीनिष्ठ विचारवंत राजकुमार घोगरे आहेत. स्वागताध्यक्ष द्राक्षगुरू सुभाष आर्वे हे आहेत. तासगाव येथील नगरपालिकेच्या साने गुरुजी सांस्कृतिक सभागृहात संमेलन होईल,’’ अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक बाळासाहेब रास्ते यांनी दिली.

या संमेलनाचे उद्‍घाटन कृषी, सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्या हस्ते होईल. बीजमाता राहीबाई पोपेरे या प्रमुख पाहुण्या असतील. खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील, बाबाराजे देशमुख, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, ह.भ.प. तुकाराम महाराज बागडे, रघुनाथ पाटील, रोहित पाटील हे उपस्थित राहतील.

शेतकऱ्यांने पिकविलेले विकले गेले पाहिजे. पिकवताना त्याला कमी खर्चात टिकवता आले पाहिजे, यासाठी अनेक तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. आज (ता. २६) सकाळी ९ वाजता शेती अवजारे पूजन व ग्रंथ दिंडी होईल. दुपारी एक वाजता उद्‍घाटन सोहळा होईल. त्यानंतर पहिल्या सत्रात ‘मिथला घाट की बलीराजा सभ्यता’ या विषयावर चर्चासत्र होईल. त्यात देशभरातील तज्ज्ञ भाग घेतील. दुसऱ्या सत्रात ‘भारतीय शेती व शेतकऱ्यांचे प्रश्‍न व त्यावरील उपाय’ यावर मार्गदर्शन होईल. या वेळी कवी संमेलनही होईल.

सोमवारी तासगाव येथील ओवीकार अर्जुन थोरात व मंडळी बिरूदेव ओवीकर मंडळातर्फे ‘ओवी बळीराजाची’ का कार्यक्रम होईल. ‘महासम्राट बळीराजाची कृषी संस्कृती’ या विषयावर ह. भ. प. धर्मकीर्ती महाराज (परभणी), प्रीती राऊत (नागपूर)

मार्गदर्शन करतील. ‘शेती शेतकरी व आपल्या महामानवांचे विचारधारा व कार्य’ यावर मार्गदर्शन करतील. त्यानंतर विशेष सन्मान सोहळा होईल. त्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील, राजकुमार घोगरे, आमदार अरुण लाड, वैभव नायकवडी, दिगंबर कांबळे, अरुण खरमाटे आदी उपस्थित राहतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Sandalwood: लाल चंदन प्रकरणावर सहा महिन्यांत निर्णय घ्या

Farmer Support: टंचाईत शेतकऱ्यांना अडचणी भासू देऊ नयेत : पालकमंत्री बोर्डीकर

Farmer Support: गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री भरणे

Drought Declaration Demands: प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे दुष्काळ जाहीर करा : झनक

Multi State Cooperative Society: एन साई मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला ७ कोटी ९ लाखांचा नफा : ठोंबरे

SCROLL FOR NEXT