Bribe Agrowon
ताज्या बातम्या

Nashik Bribe News : नाशिकचा तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यात

Nashik Tehsildar Bribe News : नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील जमिनीच्या उत्खनासंदर्भात सव्वा कोटींचा दंड केल्याप्रकरणाची फेरचौकशी करीत असताना नाशिक तालुक्याच्या तहसीलदाराने १५ लाखांच्या लाचेची मागणी केली.

Team Agrowon

Nashik News : नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील जमिनीच्या उत्खनासंदर्भात सव्वा कोटींचा दंड केल्याप्रकरणाची फेरचौकशी करीत असताना नाशिक तालुक्याच्या तहसीलदाराने १५ लाखांच्या लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना तहसीलदार नरेशकुमार बहिरम (४४, रा .मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.

तकारदाराच्या तक्रारीनुसार, नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथे शेतजमीन आहे. या जमिनीमध्ये मुरुमाचे उत्खनन करण्यात आले होते. त्यासंदर्भात नियमानुसार पाचपट दंड व स्वामित्वधन जागा भाडे मिळून त्यांना १ कोटी २५ लाख ६ हजार २२० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. या संदर्भात जमीन मालक यांनी या आदेशाविरुद्ध उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते.

त्याबाबत आदेश होऊन हे प्रकरण पुनश्च फेरचौकशीसाठी नाशिक तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे पाठविण्यात आले. या मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापरल्याचे जमिनीच्या मालकांनी त्यांच्या कथनात नमूद केले होते. याबाबत पडताळणी करण्यासाठी तहसीलदार बहिरम याने जमीन मालकाला त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला येथे स्थळ निरीक्षणावेळी बोलाविले होते.

परंतु जमिनीचे मालक वयोवृद्ध व आजारी आहे. त्यामुळे त्यांनी यातील तक्रारदारास त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिल्याने ते निरीक्षण वेळी उपस्थित होते. त्यावेळी लाचखोर बहिरम याने तक्रारदाराकडे तडजोडीअंती १५ लाख रुपये लाचेची मागणी केली.

या प्रकरणी पथकाने लाच मागणी केल्याची पडताळणी पंचनाम्यावेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पथकाने शनिवारी (ता.५) सायंकाळी कर्मयोगी नगर परिसरात बहिरम यास १५ लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे. तसेच, बहिरम याच्या फ्लॅटमध्ये पथकाकडून रात्री उशिरापर्यंत झडतीसत्र सुरू होते. अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे, स्वप्नील राजपूत, गणेश निंबाळकर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांनी ही कारवाई केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement: गंगाखेड केंद्रावर साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी

Swachh Bharat Mission: हिंगोली जिल्ह्यात ‘प्लॅस्टिक कचरा मुक्त गाव’ अभियान विशेष मोहीम

Farmers Compensation: परभणीत अतिवृष्टी अनुदानाचे ४२५ पैकी ३४२ कोटी रुपये वितरीत

Crop Loan: कर्ज वसुलीला स्थगिती तरी सेंटलमेंटच्या आडून तगादा

Vegetable Farming: दोडका उत्पादनात गुणवत्ता, दर्जा राखण्यावर भर 

SCROLL FOR NEXT