Onion Export agrowon
ताज्या बातम्या

Onion Export : कांदा निर्यात शुल्कावरून वाद चिघळणार, बाजार समित्या बेमुदत बंद राहणार

Nashik Market Committee : केंद सरकारकडून कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर राज्यातील अनेक शेतकरी संघटना रस्त्यावर उतरत आक्रमक भूमिका घेत आहेत.

sandeep Shirguppe

Central Government Onion Farmer : केंद सरकारकडून कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर राज्यातील अनेक शेतकरी संघटना रस्त्यावर उतरत आक्रमक भूमिका घेत आहेत. दरम्यान मागच्या वर्षभरात कांद्याला मातीमोल दर मिळाला, तेव्हा सरकारने डोळेझाक केली होती का असा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे.

दरम्यान कांदा निर्यात शुल्क लादल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवणार आहेत. जिल्ह्यातील कांदा व्यापारी व निर्यातदार यांच्या लासलगाव येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बंदचा निर्णय शेतकऱ्यांपर्यंत उशिरा पोहोचणार असल्याने बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली, तर ते लिलाव काढून त्यानंतर बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या अनेक संघटनांच्या विनंतीनुसार बेमुदत बंदचा निर्णय व्यापारी वर्गाने घेतला असून, या बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील १४ समित्यांवरील लिलाव बेमुदत बंद ठेवलेले आहेत. काल झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. तर एकमेव पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलावासाठी ट्रॅक्टर आल्याचे समजते आहे. त्यामुळे येथील कांदा लिलाव सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत ९६ लाख २५ हजार ८३८ क्विंटल वर्षभरात आवक असते, तर ९ अब्ज वीस कोटी, ४९ लाख ६३ हजार ९७८ इतकी या बाजार समितीची उलाढाल असते.

दरम्यान केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच मोठे नुकसान होणार आहे, त्यामुळे शेतकरी संतप्त झालेले असून व्यापाऱ्यांनी देखील शेतकऱ्याच्या हिताचे धोरण लक्षात घेता आज संपूर्ण बाजार समित्यांमधील लिलाव बंद ठेवला. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विविध ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT