उसाला मान्य केलेले दर न दिल्यास राज्यभर आंदोलन Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Rate : ‘नासाका’ कडून उसाला २४०१ रुपये दर जाहीर

जिल्ह्यातील सर्वाधिक दराचा दावा; पंधरवड्याचे पेमेंट लवकरच

Team Agrowon

नाशिक : गेल्या नऊ वर्षांपासून बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना मे दीपक बिल्डर ॲण्ड डेव्हलपर्स यांनी चालविण्यास घेतला आहे. त्यानुसार २०२२- २३ या हंगामासाठी उसाला २,४०१ रुपये प्रति टन दर जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या पंधरवड्याचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. सध्याचा हा जिल्ह्यातील सर्वाधिक दर असल्याचे सांगण्यात आले आहे.

नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर या चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला हा कारखाना सुरू झाल्याने ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला कारखान्याच्या यंत्रसामग्रीत अडचणी निर्माण झाल्या होत्या; मात्र व्यवस्थापनाने त्यावर मात केल्याने सध्या कारखाना सुरळीतपणे चालू आहे. कारखान्यास उसाचा अधिकचा पुरवठा व्हावा त्यासाठी व्यवस्थापनाने ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणेला प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केलेले आहे. कारखान्याचे चालू गळीत हंगामात ३.५० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठरविलेले आहे. ते साध्य करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत. यासाठी शेतकरी, कामगार, ऊसतोड व वाहतूक यंत्रणा यांचेदेखील सहकार्य मोलाचे आहे.

कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी ऊस इतर कारखान्याकडे न देता ‘नासाका’ला देऊन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास घेतल्यानंतर हा पहिलाच गळीत हंगाम असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हिताचा विचार करून नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक दर जाहीर केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत- जास्त ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष खासदार हेमंत गोडसे, संचालक दीपक चंदे, शेरझाद पटेल, सागर गोडसे, कार्यकारी संचालक सुकदेव शेटे आदींनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT