Agrowon
ताज्या बातम्या

'Nar-Par, Girna river link' : ‘नार-पार, गिरणा नदीजोड’ला दोन महिन्यांत मान्यता

आमदार आहेरांच्या विधानसभेतील प्रश्नाला उपमुख्यमंत्र्यांचे उत्तर

Team Agrowon

देवळा, जि. नाशिक : नाशिक (Nashik) व जळगाव (Jalgaon) जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पास राज्य शासनाच्या ८ हजार कोटींच्या निधीतून येत्या दोन महिन्यात मान्यता देण्यात येईल,

असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले, अशी माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की नार-पार गिरणा नदीजोड योजनेमुळे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. नार-पार प्रकल्पासाठी गेल्या अधिवेशनातदेखील चर्चा झाली होती.

विविध नेते व लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता. चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आहेर यांनी शुक्रवार विधानसभेत याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

त्यात पश्चिमेला जे चाळीस टीएमसी पाणी वाहून जाते परंतु आताच्या डीपीआरमध्ये दहा टीएमसी पाणी वळविण्याचे प्रयोजन आहे, ते आपण वाढवणार का, गोदावरी खोऱ्याला पाणी वळवणे, चांदवड-देवळा तालुक्यांसाठी हायराईज कॅनॉल घेणे, या मागणीची लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली होती.

त्या सूचनेस उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत उत्तर दिले.
यासाठी साधारणतः आठ हजार कोटींचा निधी राज्य शासन खर्च करणार असून या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला आहे.

येत्या दोन महिन्यांत या संदर्भातील सर्व मान्यता मिळून मंत्री उपसमिती आणि मंत्रिमंडळ बैठकीतही त्यास मान्यता देण्यात येईल.

ते म्हणाले की, नार-पार, औरंगा व आंबिका या चार पश्चिमी वाहिनी नद्या महाराष्ट्र राज्यात उगम पाऊन पश्चिमेकडे वाहत अरबी समुद्राला मिळतात.

हे अतिरिक्त पाणीउपसा करून पूर्वेकडील अतितुटीच्या गिरणा उपखोऱ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना प्रस्तावित केली आहे.

नाशिक व जळगावमधील ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला लाभ
या योजनेमध्ये ९ धरणे प्रस्तावित आहेत. मानखेडे, सालभोये, मांजरपाडा या ३ लिंकद्वारे २६०.३० दलघमी पाणी उर्ध्वगामी नालिकेद्वारे उपसा करून चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्याचे प्रस्तावित असून पुढे ७९.९२ किमी लांबीच्या प्रवाही बंद नलिकेद्वारे सिंचन करणे आहे.

त्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगाव व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पारोळा या तालुक्यातील एकूण ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला मिळणार आहे.

या प्रकल्पामुळे देवळा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचे आमदार डॉ. आहेर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gay Gotha Scheme: गायी-म्हशींसाठी गोठा बांधण्यास २.३१ लाखांपर्यंत अनुदान; जनावरांच्या संरक्षणासाठी सरकारची योजना

Rural Farmer Issue: ग्रामीण महाराष्ट्र कर्जबाजारी का होत आहे?

Soybean Farming: सोयाबीन पिकावर वाढू शकतो रोगांचा प्रादुर्भाव

Modern Fisheries: शेतीला दिली आधुनिक मस्त्यपालनाची जोड

Agro Industry: बचत गटातून मिळाल्या रोजगाराच्या नव्या वाटा

SCROLL FOR NEXT