River Linking Project : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी ८२ हजार कोटी

विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
River Linking Project
River Linking ProjectAgrowon
Published on
Updated on

नागपूर : ‘‘विदर्भातील जिल्ह्यांना संजीवनी ठरणारा वैनगंगा ते नळगंगा (Vainganga toNalganga ) हा महत्त्वाचा नदी जोड प्रकल्प (River Linking Project ) आहे. त्यासाठी ८२ हजार कोटी रुपये राज्य सरकार खर्च करेल. त्यासाठी पाच लाख ७२ हजार हेक्टर जमीन संपादित केली आहे,’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

River Linking Project
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप कागदावरच

भाजपच्या श्वेता महाले यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे बुलडाणा आणि अन्य जिल्ह्यांतील नदीजोड प्रकल्प आणि शेतीच्या विषयाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, ‘‘या नदीजोड प्रकल्पासाठी ४२६ किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येत आहे. राज्यातील सर्वात मोठा हा बोगदा असेल. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा या सर्व जिल्ह्यांना याचा लाभ होईल.

River Linking Project
Irrigation : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी ११ हजार कोटी

प्रकल्पासाठी ५ लाख ७२ हजार हेक्टर जमीन संपादित केली आहे. यासाठी सुधारित आराखडा तयार आहे. त्यासाठी ८२ हजार कोटी खर्च सरकार करेल. या प्रकल्पात वाशीम जिल्ह्याचा समावेश आहे. हायेस्ट पॉइंटवरून पाणी लिफ्ट करून वाशीम जिल्ह्याला मिळेल. हा प्रकल्प पुढे परभणी, हिंगोलीपर्यंत नेण्यासाठी आराखडा केला आहे. सर्व आराखडे तयार झाले आहेत. राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता घेऊन नियामकाकडे प्रकल्प सादर करणार आहोत. मान्यतेनंतर निविदा काढण्यात येईल.’’

बुलडाण्यातून वाशीमला पाणी

‘‘बुलडाण्यातून वाशीमला पाणी जाऊ शकेल, या दृष्टीने प्रयत्न केले जातील. यासाठी कमीत कमी जमीन हस्तांतरित झाली पाहिजे. सर्व जागा अधिग्रहित करून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे,’’ असे फडणवीस यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com