Kardai Production Agrowon
ताज्या बातम्या

Safflower Production : करडई उत्पादनात नांदेडचा राज्यात डंका

Rabbi Season : ‘रब्बी हंगाम २०२१’मध्ये करडई पीक स्पर्धेत भाग घेतलेल्या देगलूर तालुक्यातील तिन्ही शेतकऱ्यांना राज्यस्तरीय पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस मिळाले आहे.

Team Agrowon

Nanded Agriculture News : ‘रब्बी हंगाम २०२१’मध्ये करडई पीक (Safflower Production) स्पर्धेत (Rabi Crop Competition) भाग घेतलेल्या देगलूर तालुक्यातील तिन्ही शेतकऱ्यांना राज्यस्तरीय पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस मिळाले आहे.

कृषी विभागाने (Agriculture Department) सातत्याने केलेल्या कामामुळे नांदेड जिल्ह्याचा करडई उत्पादनात राज्यात डंका वाजला आहे. मागील वर्षीही नांदेडला करडई उत्पादनात तिन्ही बक्षिसे मिळाली होती हे विशेष.

पीक उत्पादनात स्पर्धात्मक वाव मिळावा यासाठी राज्य शासन पीक स्पर्धा आयोजित करते. ‘रब्बी हंगाम २०२१’साठी राज्यस्तरीय पीक स्पर्धेचे आयोजन केले होते. यात प्राप्त उत्पादकतेच्या आकडेवारीवरून करडईचे राज्यस्तरीय तिन्ही पुरस्कार नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्याला मिळाले आहेत.

गंगाबाई केरले (रा. इब्राहिमपूर ता. देगलूर) यांना करडईचे उत्पादन हेक्टरी २८ क्विंटल ८३ किलो आल्याने त्यांना प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला. तर २४ क्विंटल एक किलो हेक्टरी उत्पादन घेतल्याने करेमलकापूर (ता. देगलूर) येथील राजेश जमादार यांचा दुसऱ्या, तर कुडली (ता. देगलूर) येथील सुनील चिमनपांडे यांना हेक्टरी २३ क्विंटल ९ किलो उत्पादन आल्याने त्यांचा तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराचा बहुमान मिळाला आहे.

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दूल सत्तार यांच्या हस्ते सत्कार होईल.

जिल्हाध्यक्ष अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी शेतकऱ्यांना विविध पिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी प्रोत्साहित केले. करडई उत्पादकता वाढीसाठी देगलूर तालुक्यात मागील दोन वर्षांपासून चांगले काम होत आहे.

त्यामुळे सलग दोन वर्षे जिल्ह्याला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. तत्कालीन देगलूर तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करडई उत्पादनाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Pumps Power Connections: महावितरणकडून १३ हजारावर कृषीपंपांना वीजजोडण्या

Sugarcane Smut Disease: उसावरील चाबूक काणी रोगाचे नियंत्रण कसे करावे?

Kharif Crop Loan Rates: नांदेडला पिकांसाठी पीककर्ज दर निश्चित

Organic Fertilizers: सेंद्रिय खतांमुळे जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कशी वाढते?

Mohol-Tandulwadi Highway Project: मोहोळ-तांदूळवाडी महामार्गावरून सोलापुरात ‘श्रेयवाद’

SCROLL FOR NEXT