Nana Patole  Agrowon
ताज्या बातम्या

Nana Patole On Abdul Sattar : वसुलीबाज कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी कराः नाना पटोले

Abdul Sattar Latest News : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

Team Agrowon

Nana Patole Statement On Abdul Sattar : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. मुंबईत टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी सत्तार यांच्यावर टीकेची झोड उठवली.

`` खरीप हंगामाच्या तोंडावर शेतक-यांना खते व बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत, याची व्यवस्था करण्याऐवजी कृषिमंत्री आणि त्यांचे कार्यालय धाडी घालून वसुली करण्यात गुंग आहे. हे अतिशय गंभीर आहे. या वसुलीबाज कृषिमंत्र्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा,`` असे पटोले म्हणाले.

अकोल्यात कृषी विभागाच्या बोगस पथकाने अधिकार नसताना निविष्ठा उत्पादक कंपन्यांच्या गोदामांवर धाडी टाकल्याच्या तक्रारीचा विषय सध्या गाजत आहे. या पथकामध्ये कृषिमंत्र्यांचे स्वीय सचिव आणि काही खासगी व्यक्तींचा समावेश असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र या धाडसत्राचे समर्थन केले आहे.

या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी कृषिमंत्री सत्तार यांच्या कारभारावर टीकेचे आसूड ओढले आहेत. पटोले म्हणाले, ``अकोल्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावाने कृषी विभागाने धाडी टाकून व्यावसायिकांकडून पैसे मागितल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.

या धाड पथकात कृषिमंत्र्यांचा स्विय सहायक दिपक गवळीसह इतर अनेक खासगी लोकांचा समावेश होता. तर आपल्याच सांगण्यावरून या धाडी टाकण्यात आल्या आहेत, त्यात चुकीचे काहीच झाले नाही असे कृषिमंत्री स्वतःच सांगत आहे. यावरून ते किती निर्ढावलेले आहेत हे दिसून येते.``

अब्दुल सत्तार यांना शेतकऱ्यांबद्दल अजिबात चिंता नाही. त्यांनी मंत्री झाल्यापासून आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतक-यांना धीर दिला नाही अडचणींच्या काळात मदत केली नाही. याऊलट सातत्याने बेजबादार विधाने करून शेतक-यांचा आणि कष्टक-यांचा अवमान केला आहे, असे पटोले म्हणाले.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेनेच्या पाच वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यासाठी भाजपने दबाव आणला असल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. यांसदर्भात विचारले असता पटोले यांनी पाच मंत्र्यांना काढण्यापेक्षा हे सरकारच बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी प्रतिक्रिया दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Subsidy : २०२३ च्या कांदा अनुदानासाठी २८ कोटी रुपये मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध

Hydrogen Fuel cooking: आता हायड्रोजन इंधनावर स्वयंपाक शक्य

Heavy Rain: दमदार पावसाने ४६ हजार हेक्टरवरील पिकांना संजीवनी

Agriculture Success: तांत्रिक व्यवस्थापनातून फळबाग शेतीत समृद्धी

Dairy Business: दुग्ध व्यवसायाने पालटेल विदर्भाचे चित्र

SCROLL FOR NEXT