Rohit Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Onion Market : ‘नाफेड’ने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा

केंद्र व राज्यातील सरकारतर्फे ‘नाफेड’ने शेतकऱ्यांकडे असलेला सर्व कांदा खरेदी करून तो इतर देशात विकावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली.

Team Agrowon

Onion Market Update नैताळे, ता. निफाड : केंद्र व राज्यातील सरकारतर्फे ‘नाफेड’ने (NAFED) शेतकऱ्यांकडे असलेला सर्व कांदा खरेदी (Onion Procurement) करून तो इतर देशात विकावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली.

नैताळे (ता. निफाड) येथील कांदा उत्पादक शेतकरी सुनील बोरगुडे यांनी शनिवारी (ता. २५) आपल्या दोन एकर कांद्याच्या शेतावर रोटाव्हेटर फिरविला.

या बाबतचे वृत्त समजल्यानंतर दुपारनंतर आमदार रोहित पवार पवार यांनी नाशिकमधील कार्यक्रम आटोपून थेट निफाडचा रस्ता धरत बांधावर पोचले.

बोरगुडे यांची भेट घेत त्यांना धीर दिला.कांद्यासंदर्भातील त्यांच्या सर्व व्यथा जाणून घेतल्या. या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

रोहीत पवार म्हणाले, ‘‘कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्च बघितला तर सध्याचा बाजारभाव न परवडणारा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

राज्यकर्ते कसबा व पिंपरी-चिंचवडच्या निवडणुकीत गुंतले असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी वेळच नाही. असले सरकार काय उपयोगाचे, हे सरकार कांदा उत्पादकांऐवजी खाणाऱ्यांचा विचार करीत आहे.

या प्रसंगी अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरीही उपस्थित असल्याने त्यांनीही द्राक्ष निर्यातीसंदर्भाच्या समस्या आमदार पवारांना सांगितल्या. द्राक्ष निर्यातीवर होणारा खर्च वाढल्याने व्यापारी कमी दराने द्राक्ष खरेदी करत आहेत, यासाठी सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे सांगून शेतकऱ्यांनी रासायनिक खते, कीटकनाशके यांचे वाढलेले बाजारभाव अन् भांडवलीखर्चाचा हिशोब मांडला.

आमदार पवार यांनी सर्व शेतकऱ्यांच्या समस्या व व्यथा जाणून घेतल्या. येत्या दोन-तीन दिवसांत कांदा, द्राक्ष व कापूस यासंबंधीचे सर्व प्रश्न शरद पवार, अजित पवार यांच्यापर्यंत नेमकेपणाने पोचवेल व त्यासंबंधी चर्चा करेल, असे आश्वासनही आमदार पवार यांनी दिले. येत्या दोन-तीन व दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस त्याबाबत ठोस भूमिका घेणार असल्याचे सांगितले.

या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, नवनाथ बोरगुडे, राजेंद्र बोरगुडे, शिवाजी बोरगुडे, दत्तात्रेय भवर, किशोर बोरगुडे, सोपान बोरगुडे, भूषण शिंदे, लहानू पाटील बोरगुडे, अॅड. प्रवीण ठाकरे, रत्नाकर दरेकर, बंटी शिंदे, सचिन जाधव, राहुल सानप, देविदास बोरगुडे, राहुल बोरगुडे, रतन बोरगुडे, शरद घायाळ, गणपतराव कांडेकर, दिलीप पवार, नितीन बोरगुडे, योगेश बोरगुडे आदी शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT