Waghya GHevda Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Waghya Ghevda: माझ्या कुटुंबाचा १० गुंठ्यातला वाघ्या-घेवड्याचा प्रयोग

रब्बी हंगामाला ज्वारी पेरत असलेल्या जमिनीत वाघ्या-घेवडा चांगला येईल का? हा प्रश्न मनात होता...या वर्षी अतिवृष्टीने चिबडलेली रान (शेती) पाहता, ज्वारीची पेरणी मागास होऊन उत्पादनावर परिणाम होणार असल्याने वाघ्या घेवडा पेरण्याची निर्णय घेतला.

डॉ. सोमिनाथ घोळवे

Waghya Ghevda Cultivation रब्बी हंगामाला ज्वारी पेरत (Jowar Sowing) असलेल्या जमिनीत वाघ्या-घेवडा चांगला येईल का? हा प्रश्न मनात होता...या वर्षी अतिवृष्टीने चिबडलेली रान (शेती) पाहता, ज्वारीची पेरणी मागास होऊन उत्पादनावर परिणाम होणार असल्याने वाघ्या घेवडा पेरण्याची निर्णय घेतला.

घेवडा पीक घेण्याचा प्रयोग माझाच आहे असे नाही. तर कोरडवाहू परिसरात रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक जास्त खर्चिक होऊन कमी परतावा देणारे पीक झाल्याने, अलीकडे अनेक शेतकरी घेवडा पीक घेण्याकडे वळले आहेत.

सर्वसाधारणपणे ७५ ते ९० दिवसांमध्ये पीक पदरात पडते. तसेच बाजारभाव देखील चांगला आहे. दुसरे असे की, हे तुलनेने कमी पाण्यात येणारे पीक आहे. जमिनीचा प्रकार आणि पोत यानुसार पाणी लागते. काळ्या जमिनीत 20 ते 25 दिवसांतून एकदा पाणी मिळाले तरी पुरते.

मी घेतलेला घेवड्यासाठी तांबडी जमीन असल्याने पूर्ण पीक पदरात पाडण्यास सहा वेळा पाणी (15 दिवसातून एकदा) देऊन पीक पदरात पाडून घेतले.

प्रथमच घेवडा पीक घेत असल्याने, जमिनीच्या कमी क्षेत्रावर पीक घ्यावे, असे कुटुंबात चर्चा करून ठरवले. त्यासाठी मुरमाड-तांबडी असलेल्या 10 गुंठ्याचा क्षेत्र असणाऱ्या शेताची निवड केली.

घेवड्यासाठी निवड केलेल्या जमिनीमध्ये गेल्या तीन वर्षापासून आम्ही खरीपामध्ये सोयाबीन आणि रब्बीला कांदा लागवड करत होतो. यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन घेतले. सोयाबीन पिकाचा गळलेला पाळा-पाचोळा जमिनीत कुजवला होता. त्यामुळे घेवड्यासाठी सोयाबीनचा चांगल्याप्रकारे बेवड झाला होता. त्या बेवडाचा फायदा घेवड्याला झाला.

10 गुंठे क्षेत्रफळ असलेल्या शेतीतील घेवड्याने गुंतवणूकीच्या तुलनेत रूपये11450/- जास्तीचा परतावा दिला....(कुटुंब यामध्ये समाधानी आहे. )

10 गुंठे क्षेत्र असलेल्या शेतीने 90 दिवसांमध्ये 11450/- हा जास्तीचा मिळालेला परतावा कसा आहे? हे वाचकांनी ठरवावे. मी यावर जास्त भाष्य करत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Meat Ban Protest: स्वातंत्र्य दिनानिमित्त मांसविक्री बंदीच्या निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाजाचे कल्याण-डोंबिवलीत आंदोलन

Lumpy Skin : सिन्नर, निफाड तालुक्यांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

Agriculture Scheme: पाईप खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान ; सिंचन सुविधा सुलभ करण्यासाठी सरकारकडून मदत

PDKV Akola : गैरहंगामी काळात प्रक्रिया उत्पादने विका

Wild Vegetables : पैठण रोडवरील ‘केव्हीके’त रानभाजी महोत्सवाचे आयोजन

SCROLL FOR NEXT