Vegetable Rate : दराअभावी शेतकऱ्याकडून मेथी, कोथिंबिरीचे फुकट वाटप

सध्या लेट खरीप कांद्याचा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. त्यातच भाजीपाला उत्पादक उत्पादन खर्चावर अपेक्षित दर मिळत नसल्याने अडचणीत सापडले आहेत.
Vegetable Market
Vegetable MarketAgrowon
Published on
Updated on

Vegetable Rate नाशिक ः सध्या लेट खरीप कांद्याचा (Onion Rate) उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. त्यातच भाजीपाला उत्पादक (Vegetable Producer) उत्पादन खर्चावर अपेक्षित दर मिळत नसल्याने अडचणीत सापडले आहेत.

मेथी आणि कोथिंबिरीच्या जुडीला ७ ते १० रुपये प्रतिजुडी दर मिळणे अपेक्षित असताना अवघा १ रुपया दर मिळत आहेत. नाशिक बाजार समितीत (Nashik APMC) शुक्रवारी (ता. ३) शेकड्याला १०० रुपये बोली लागल्याने संतापलेल्या शेतकऱ्याने पंचवटी परिसरातील दिंडोरी नाक्यावर मेथी फुकट वाटली.

नाशिक बाजार समितीत लिलावात शुक्रवारी (ता. ३) कोथिंबीर आणि मेथी दरात मोठी घसरण होऊन शेकडा १०० रुपयांचा दर निघाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी हतबल होऊन लिलावातून भाजी काढून घेत दिंडोरी नाका येथे अक्षरशः फुकट वाटली. यामुळे भाजी घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे दिंडोरी नाका परिसरात वाहतुकीची कोंडी झाली.

Vegetable Market
Vegetable Market : दर घसरल्याने पालेभाज्या फुकट वाटण्याची वेळ

जोपुळ (ता. दिंडोरी) येथील कृष्णा उगले, संतोष बरकडे आदी शेतकऱ्यांनी मेथी फुकट वाटली. किरकोळ विक्रेते मात्र पालेभाज्यांची १० ते १५ रुपयांना विक्री करत आहेत. पालेभाज्यांची आवक वाढल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे व्यापारी सांगत आहे. मात्र किरकोळ विक्रीत ८ रुपयांची तफावत कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.

Vegetable Market
Vegetable Farming : भेंडी पीक खानदेशात काढण्यास सुरवात

ग्राहकांचा किळसवाणा प्रकार

काही ग्राहकांचा किळसवाणा प्रकार पाहायला मिळाला. त्यांनी ४ -५ पालेभाज्या जुड्या शेतकऱ्यांकडून फुकट नेल्या. तर काही ग्राहक त्यापोटी पैसे देऊ खरेदी करत होते. मात्र यातून कुठला उत्पादन खर्च निघणार.

त्यामुळे फुकट घेऊन जा, अशी उद्विग्न भावना शेतकऱ्यांमध्ये दिसून आली. केलेला उत्पादन खर्चही वसूल करणे सध्या अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

शेतकऱ्यांची हळहळ

एक एकर कोथिंबीर व मेथी उत्पादनासाठी १५ ते २० हजार रुपये खर्च येतो. त्यात काढणी, हाताळणी, प्रतवारी, बांधणी करण्यासाठी प्रतिजुडी अडीच रुपये तर पालेभाज्या बाजारात आणण्यासाठी वाहतुकीसाठी अडीच रुपये असा पाच रुपये अतिरिक्त खर्च आहे. त्यातच एक रुपया दर मिळत असेल तर शेतकऱ्यांनी कसे जगायचे, अशी हळहळ कृष्णा उगले यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com