Mumbai-Goa Highway Agrowon
ताज्या बातम्या

Land Acquisition Compensation : महामार्गबाधित अद्याप मोबदल्‍याच्या प्रतीक्षेत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. तर उर्वरित काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

Team Agrowon

महाड : मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) चौपदरीकरणाचे दासगाव ते वीर या टप्प्यातील सुमारे तीन किलोमीटरचे काम वनखात्याची (Forest Department) परवानगी नसल्याने बंद होते.

काही दिवसांपूर्वी परवानगी मिळाल्याने सध्या काम सुरू आहे. वन खात्याने सरकारी जमिनीला (Government Land) हिरवा कंदील दिला असला तरी काही जमीन मालकांना अद्याप मोबदला मिळाला नसल्याने येथील कामात अडचणी येण्याची शक्यता आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. तर उर्वरित काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. महामार्गाचे महाड (Mahad) आणि पोलादपूर (Poladpur) या दोन तालुक्यांत ३८.७६ किमीचे काम आहे.

या टप्प्यांत ३५ किमीचे काम ‘एल अँड टी’कडून पूर्ण झाले. वीर आणि दासगावदरम्यान ज्या वनखात्याच्या सरकारी जमिनी आहेत, त्यांना वन खात्याकडून कामाची परवानगी मिळाली आहे.

या ठिकाणी सध्या रस्त्याचे काम ठेकेदार कंपनीने सुरू केले आहे. मात्र ज्या खासगी जमिनींवर ‘वनजमिनी’ असा उल्लेख करण्यात आला आहे अशा जमिनींना अद्याप परवानगी मिळाली नसल्याने ते मालक मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रतिक्षेत आहेत.

वन जमीन मालकांना मोबदला देण्याबाबतच प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रश्न निकाली निघेल. जमीन मालकांनीही काम सुरू करण्याबाबत हरकत नसल्याचे सांगितले आहे.
प्रतिमा पुदलवाड, प्रांताधिकारी, महाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT