leopard attacks Agrowon
ताज्या बातम्या

Leopard Attack : लेकरासाठी आईची बिबट्याशी झुंज

गेल्या काही दिवसांपासून गुंजाळवाडी परिसरातील रहिवासी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे.

Team Agrowon

नगर : संगमनेर शहरानजीकच्या गुंजाळवाडीमधील देशमुखनगर परिसरातील एका घराच्या पोर्चमधून चार वर्षे वयाच्या मुलाला बिबट्याने (Leopard Attack) उचलून नेल्याची घटना शनिवारी (ता. १४) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. आईने जिवावर उदार होऊन पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दाढेतून खेचले.

गेल्या काही दिवसांपासून गुंजाळवाडी परिसरातील रहिवासी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे. सायंकाळी या परिसरातील सिमेंट पोल फॅक्टरीच्या परिसरातील कृष्णाई बिल्डिंगच्या पाठीमागील भागात मोठ्या प्रमाणात बाभळींचे रान माजले आहे.

संभाजी पवार यांच्या राहत्या घराजवळ खेळणाऱ्या शिवमवर (वय ४) बिबट्याने अचानक हल्ला केला. त्याच्या मानेला पकडून ओढत समोरच्या मोकळ्या प्लॉटमध्ये नेले. या वेळी जवळच त्याची आजी व चुलती बसलेली होती.

त्यांनी आरडाओरडा केल्याने, त्याची आई रत्नश्री हिने बिबट्याच्या पाठीमागे धाव घेऊन, मुलाला त्याच्या तोंडातून ओढून काढले. या घटनेत मुलाच्या हनुवटीजवळ जखम झाली, तसेच त्याच्या छातीला बिबट्याच्या पंजामुळे जखमा झाल्या.

कुटुंबीयांनी त्याला तातडीने जवळच्या खासगी दवाखान्यात प्रथमोपचारासाठी नेले, तसेच घुलेवाडीच्या ग्रामीण आरोग्य केंद्रात हलवले.

घटनास्थळी दाखल झालेल्या वन विभागाच्या पथकाने शोध घेतला असता, झुडपात लपलेला बिबट्या दिसला, मात्र संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी जेसीबी घातल्याने त्याने पळ काढला.

जखमी शिवमच्या हनुवटीला सात ते आठ टाके पडले आहेत. रात्री उशिरापर्यंत वन विभागाच्या पथकाने बिबट्याच्या शोधार्थ परिसर पिंजून काढला. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Market: अचलपूर बाजार समितीत मक्याची मोठी आवक; बाजारात शेतकऱ्यांची गर्दी

Sugarcane Price: स्वाभिमानीच्या आंदोलनापुढे कारखानदार नमले! सोलापुरात ऊसदराचा तिढा सुटला; शेतकऱ्यांना मिळणार ३ हजार ४५० रुपये

Someshwar Sugar Factory: ‘सोमेश्वर’ कारखान्याकडून उसाला ३ हजार ९५१ रुपयांचा पहिला हप्ता जाहीर

Sugarcane Workers Rights Campaign: ऊस तोडणी कामगारांच्या हक्कासाठी अभियान सुरू

Watermelon Farming: कलिंगड पिकात शेतकऱ्यांना मोठा फटका

SCROLL FOR NEXT