चांदोरी ः निफाड तालुक्यात सुमारे तीसहून अधिक गावांत बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाकडील नोंदींवरून दिसून येते.
गावातील नागरी वस्ती वाढत असताना, आतापर्यंतच्या पाच वर्षांत सुमारे दोनशेहून अधिक पाळीव प्राणी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले आहेत.
जंगलात बिबट्याला खाद्य मिळत नसल्याने तो नागरी वस्तीकडे वळत आहे. लोकांमध्ये त्याची धास्ती वाढत आहे.
चांदोरीसह गोदाकाठ परिसरात बिबट्याच्या वावरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बिबट्यासाठी चांदोरी परिसर बिबट्या प्रवणक्षेत्र झाला आहे.
बिबट्या वसाहतीकडे येतो आहे, त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांत शिंपी टाकळी फाटा परिसरात रस्ता ओलांडताना एक बिबट्या अपघातात जखमी झाला असता वनविभागाने जेरबंद केला.
रविवारी (ता.८) सुकेणा फाटा परिसरात अशोक जाधव यांच्या उसातून रस्ता ओलांडून जात असताना तो जखमी झाला.
बिबट्याच्या वावर क्षेत्रात घराच्या आजूबाजूस दिवे असावेत. बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये. त्वरित वनविभागाला कळवावे.
पाठलाग केल्यास घाबरून जाऊन बिबट्या प्रतिहल्ला करू शकतो. मजुरांनी विशेष काळजी घ्यावी.
अक्षय म्हेत्रे, वनपरिक्षेत्र अधिकारी, येवला
चांदोरी परिसरात नाशिक- औरंगाबाद रोड लगत वनविभागाने फक्त बिबट्या प्रवण क्षेत्राचे बोर्ड लावून आपली जबाबदारी संपली असे न समजता पुरेशा पिंजऱ्यासह नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
- विनायक खरात, सरपंच, ग्रामपालिका चांदोरी
बिबट्याच्या हल्ल्यात पशुधनाचे नुकसान होत असून पंचनामा होऊन ही मदत लवकर मिळत नसल्याचे चित्र आहे. वनविभागाने त्याबाबतही पुरेपूर काळजी घ्यावी.
- अनिल वाघ, शेतकरी, चांदोरी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.