CSE Center Agrowon
ताज्या बातम्या

CSC Centers : बीडमध्ये सात पेक्षा अधिक ‘सीएससी’ केंद्राच्या सेवेत त्रुटी

Crop Insurance Scheme : कृषी विभाग पथकाच्या पाहणीत सात पेक्षा अधिक सीएससी केंद्राच्या सेवेत त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यांच्यावर पथक प्रमुख यांच्या सूचनेनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात आली.

Team Agrowon

Beed News : कृषी विभाग पथकाच्या पाहणीत सात पेक्षा अधिक सीएससी केंद्राच्या सेवेत त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यांच्यावर पथक प्रमुख यांच्या सूचनेनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात आली. यामुळे तालुक्यातील अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या सीएससी केंद्र यांच्यामध्ये वचक निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी सीएससी केंद्रात शेतकरी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आहेत. यावेळी यंत्रणा व्यवस्थित कार्यरत राहावी यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांच्या निरीक्षणामध्ये क्षेत्रीय स्तरावर पथक करून पाहणी सुरू आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री जेजुरकर यांनी पथकाचे संचालन केले. सिरसाळा, दिंडरुड, हेळंब, हळम, धर्मापुरी, परळी, कासारवाडी, गुटेवाडी, वडवणी इत्यादी गावातील सीएससी केंद्रात पथक यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे, मंडळ अधिकारी महसूल आर. बी. कुमटकर, दिनेश जाधव, बाबासाहेब इनकर, तालुका विमा प्रतिनिधी भागवत डापकर इत्यादी उपस्थित होते.

यावेळी श्री. जेजुरकर साहेब यांनी शेतकऱ्यांनी १ रुपये प्रति अर्ज प्रमाणे विमा योजनेमध्ये विमा भरून घ्यावा व आपले पीक नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षित करून घ्यावे, असे आवाहन केले.

तसेच पीक विमा भरताना सीएससी चालकांनी कसल्याही प्रकाराचे अतिरिक्त शुल्क आकारण्याची गरज नाही. शासन त्यांना प्रति अर्ज ४० रुपये देते, अतिरिक्त शुल्क आकारणी बदल काही तक्रार असल्यास जवळील तहसील कार्यालय किंवा तालुका कृषी कार्यालय यांना भेट द्यावी असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Cultivation : खानदेशात रब्बी, उन्हाळ कांदा रोपवाटिका निर्मितीची तयारी वेगात

Farmers Compensation : नुकसानग्रस्तांना वेळेत मदत मिळाली पाहिजे

Crop Harvesting : खानदेशात पीक काढणी, मळणीस वेग

Onion Farming : कांदा रोपवाटिका करताना घ्यावयाची काळजी

Cucumber Farming : वाळकीच्या शेतकऱ्यांना मिळतेय काकडीचे सुधारित लागवड तंत्र

SCROLL FOR NEXT