Assam Flood  Agrowon
ताज्या बातम्या

Assam Flood : आसाममध्ये एक लाखापेक्षा जास्त नागरिक बाधित

Assam Rain Update : आसाममधील अनेक भागात गुरुवारी (ता. २२) सकाळी मुसळधार पाऊस कोसळत होता.

Team Agrowon

Rain News : आसाममधील अनेक भागात गुरुवारी (ता. २२) सकाळी मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून नवीन भागही पाण्याखाली गेले आहेत. राज्यातील दहा जिल्ह्यांमधील १.२ लाख लोक बाधित झाले आहेत, असे अधिकृत निवेदनाद्वारे गुरुवारी सांगण्यात आले.

भारतीय हवामान विभागाने आसाममध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून अत्यंत जोरदार पाऊस ते अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. गुवाहाटीतील प्रादेशिक हवामान विभागाने कालपासून २४ तासाचा इशारा दिला होता.

गुरुवार व शुक्रवारसाठी (ता. २३) ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता. कारवाईसाठी तयार राहा, असा संदेश ‘ऑरेंज अलर्ट’द्वारे देण्यात येतो तर अंदाज पाहून तयारी करण्यासाठी ‘यलो अलर्ट’ ही संज्ञा वापरली जाते.

आसाम राज्य आप्तकालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एअएसडीएमए) पूर अहवालानुसार बस्का, बारपेटा, दरंग, धेमजी, धुबरी आदी जिल्ह्यांमधील एक लाख १९ हजार ८०० नागरिक बाधित झाले आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका नालबाडीला बसला असून ४५ हजार जण बाधित झाले आहेत.

त्यानंतर बस्का व लखीमपूरमध्येही पूरस्थिती आहे. प्रशासनाने पाच जिल्ह्यांमध्ये १४ निवारा केंद्रे आणि १७ मदत वितरण केंद्रे उभारली आहेत. लष्कर, निमलष्करी दले, राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दले, अग्मिशमन आणि आप्तकालिन सेवा, नागरी प्रशासन, सामाजिक संस्था आणि स्थानिकांनी वेगवेगळ्या भागातून बाराशेपेक्षा जास्त लोकांचा बचाव केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी

Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!

Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT