Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील दमदार पावसानंतर सप्टेंबर महिन्यातही देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. हंगामाच्या अखेरच्या महिन्यात देशभरात १०९ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील दमदार पावसानंतर सप्टेंबर महिन्यातही देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. हंगामाच्या अखेरच्या महिन्यात देशभरात १०९ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department Forecast) वर्तविला आहे. वायव्य भारतातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास (Monsoon Return Journey) सप्टेंबर महिन्याच्या मध्यानंतर सुरू होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी (ता. १) ऑनलाइन पत्रकार परिषदेत सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. १९७१ ते २०२० कालावधीत देशातील मॉन्सून पावसाची आकडेवारी पाहता, सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी १६७.९ मिलिमीटर पाऊस पडतो. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.

सप्टेंबर महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात चांगल्या पावसाची शक्यता असून, ईशान्य भारत, पूर्व भारतातील राज्ये, आणि देशाच्या अतिउत्तर भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. यातच सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत पावसाला पोषक प्रणाली तयार होत असल्याने मॉन्सूनचा राजस्थानातील परतीचा प्रवास सुरू होणार नसल्याचे दिसून येत आहे.

पूर्व भारत, ईशान्य भारत, जम्मू, काश्मीरसह लगतच्या राज्यात, तसेच मध्य भारताच्या काही भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असून, उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारत आणि वायव्य भारत वगळता उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात ला-निना स्थिती वर्षाअखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, इंडियन ओशन डायपोल (आयओडी) नकारात्मक राहण्याचे संकेत वर्तविण्यात आले आहेत.

राज्यात चांगला पाऊस

सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचा अंदाज विचारात घेता राज्याच्या सर्वच भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. यातही कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांदा दरात सुधारणा; सोयाबीन स्थिरावले, हिरवी मिरची टिकून, वांगी आवक स्थिर तर मुगाचा भाव दबावातच

Cold Wave: धुळ्यात निचांकी ५.५ अंश तापमान; राज्यातील बहुतांशी भागात तापमानातील घट कायम

Farmers Issues: कॅनमधील डिझेल बंदीने शेतकरी अडचणीत

Farmer Development: शेतकऱ्यांच्या क्षमता विकासासाठी राज्याचे नवे धोरण

Horticulture Irrigation Supply: बागायती पिकांत सिंचनास वेग

SCROLL FOR NEXT