सातारा जिल्ह्यातील खरिपाची  अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी
सातारा जिल्ह्यातील खरिपाची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Season : सातारा जिल्ह्यातील खरीप पैसेवारी ५० पेक्षा अधिक

Team Agrowon

सातारा : जिल्ह्यातील २०२२-२३ वर्षाची खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली असून, त्यात महसुली एक हजार ५२१ पैकी एक हजार ४८३ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आली आहे. त्यामुळे यंदा शेतकरी वर्गाला खरीप हंगाम लाभदायी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी आलेली नाही; मात्र, ३८ गावांची पैसेवारी विविध कारणांनी झालेली नसून, त्यात सहा गावे रब्बीची आहेत.

सातारा तालुक्यात २१४ गावे महसुली असून, त्यातील २०२ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आली आहे. उर्वरित १२ गावांची पैसेवारी झालेली नाही. त्यातील सातारा, गोडोली कारंजे तर्फे सातारा व दरे खुर्द नगरपालिका हद्दीत येते. खावली या गावी गावठाण क्षेत्र आहे. करंजोशी हे गाव तारळी आणि आष्टी, पूनवडी, कातवडी खुर्द, कामथी तर्फे परळी, दहीवड व रेवली ही गावे उरमोडी जलाशयात बुडीत आहेत.

कोरेगाव तालुक्यात १३५ गावे महसुली असून या सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आली आहे. पाटण तालुक्यात ३२५ गावे महसुली असून, त्यामधील ३१० गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आली आहे. उर्वरित १५ पैकी नहीये/आंबेघर निर्मनुष्य आहे. केमसे, वाघणे, वाजेगाव, गाढवखोप, डिचोली, पुनवली, झाडोली, किसरळे ही कोयना अभयारण्यातील गावे पुनर्वसित झाली आहेत. रेठरेकरवाडी हे बुडीत क्षेत्र आहे.

ढेबेवाडी संपूर्ण क्षेत्र बिनशेती आहे. निवडे, भांबे, सावरघर ही तारळी प्रकल्पांतर्गत बुडीत गावे आहेत. कोरळ हे मोरणा गुरेघर प्रकल्पांतर्गत बुडीत गाव आहे.वाई तालुक्यात ११७ गावे महसुली असून, त्यातील ११५ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आली आहे. उर्वरित दोन जांभुळणी व चांडवडी या दोन्ही गावी संपूर्ण क्षेत्र डोंगरपड असल्याने कोणतेही पीक नाही. त्यामुळे पैसेवारी मोजण्याचा प्रश्न नाही.

महाबळेश्वर तालुक्यात ११३ गावे महसुली असून, त्यातील १०५ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आली आहे. उर्वरित आठपैकी महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये नगरपालिका असून, मालकमपेठ, मेटगुताड, नाकिंदा, क्षेत्र महाबळेश्वर, अवकाळी व धनगरवाडी ही गावे रब्बी स्वरूपाची आहेत. त्यामुळे पैसेवारी करण्यात आली नाही.

कऱ्हाड तालुक्यात २१९ गावे महसुली असून, त्यातील २१८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आली आहे. उर्वरित एका कोयना वसाहत या गावी सर्व जमीन बिनशेती असल्याने पैसेवारी झालेली नाही. जावळी तालुक्यात १५२ गावे महसुली असून, या सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आली आहे. खटाव तालुक्यात १४० गावे महसुली असून, या सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आली आहे. माण तालुक्यात १०६ गावे महसुली असून, या सर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आली आहे.

हरकतींसाठी १५ दिवसांची मुदत...

जिल्हा महसूल प्रशासनाने ही पैसेवारी ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सर्व तहसीलदार कार्यालये आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या फलकांवर लावली आहे. त्याद्वारे हंगामी सुधारित पैसेवारीबाबत ग्रामस्थांच्या हरकती १५ दिवसांच्या आता मागवून घेऊन प्राप्त हरकतींवर केलेल्या कार्यवाहीसह २० नोव्हेंबर २०२२ पूर्वी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सूचना सर्व तहसीलदाराना देण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT