Monsoon Return Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Update : वायव्य भारतातून मॉन्सून परतला

परतीचा प्रवास सुरू ठेवत संपूर्ण वायव्य भारतासह, गुजरात आणि अरबी समुद्राचा काही भागासह मध्य भारताच्या काही भागांतून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) (Monsoon Winds) परतीचा प्रवास काहीसा अडखळत सुरू आहे. सोमवारी (ता. ३) परतीचा प्रवास सुरू ठेवत संपूर्ण वायव्य भारतासह, गुजरात आणि अरबी समुद्राचा (Gujarat & Arabi Sea) काही भागासह मध्य भारताच्या काही भागांतून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

यंदा दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशिराने मॉन्सूनने वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. २० सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ भागातून मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला;

मात्र त्यानंतर आठवडाभरापेक्षा अधिक काळ मॉन्सूनच्या परतीची वाटचालीची ‘जैसे थे’ राहिली. २९ सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास पुन्हा सुरू करत संपूर्ण पंजाब, चंदीगड, राजधानी दिल्लीसह जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाना आणि राजस्थानच्या आणखी काही भागांतून परतला होता.

सोमवारी (ता. ३) राजस्थान, हरियाना, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाखसह संपूर्ण वायव्य भारतातून मॉन्सून परतला आहे. तर उत्तर अरबी समुद्रासह गुजरातचा बहुतांश भाग, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग,

उत्तराखंड राज्याच्या काही भागांतून मॉन्सूनने माघार घेतली आहे. उत्तरकाशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंत मॉन्सूनच्या परतीची सीमा असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT