Rain Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : रत्नागिरीत सर्वत्र मोसमी पाऊस धडकला

Latest Rain Update : जिल्हावासीयांना प्रतीक्षा असलेल्या मोसमी पावसाने शनिवारी (ता. २४) अखेर जिल्ह्यात सर्वत्र धडक दिली. वाऱ्यासह सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला.

Team Agrowon

Ratnagiri News : जिल्हावासीयांना प्रतीक्षा असलेल्या मोसमी पावसाने शनिवारी (ता. २४) अखेर जिल्ह्यात सर्वत्र धडक दिली. वाऱ्यासह सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला.

शुक्रवारी (ता. २३) दुपारी मोजक्याच ठिकाणी तुरळक सरी पडल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. पण शनिवार (ता. २४) सकाळपासूनच दणक्यात सुरू झालेल्या पावसाने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

शुक्रवारी सकाळी ८.३० वाजपर्यंतच्या मागील चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १६.५६ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड ५, दापोली १३, खेड ११, गुहागर ११, चिपळूण १०, संगमेश्‍वर २४, रत्नागिरी ७,

लांजा २८, राजापूरमध्ये ४० मिमी पावसाची नोंद झाली. १ ते २४ जून या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ६२ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात शनिवार सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

जिल्ह्यात भाताच्या ३० टक्के पेरण्या झाल्या होत्या. ज्यांनी धूळ पेरण्या केल्या, त्यांना दुबार पेरणीची भीती होती. संगमेश्‍वरमधील काही शेतकऱ्यांनी तशी तयारीही केली आहे. त्यांना दिलासा मिळाला. जिल्ह्यातील ७० टक्के शेतकरी पेरण्या करण्यास सज्ज झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT