PDKV AKOLA
PDKV AKOLA  Agrowon
ताज्या बातम्या

PDKV Idol : मोहन जगताप, संगीता सव्वालाखे ठरले ‘पंदेकृवि’चे आयडॉल

Team Agrowon

Akola News ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (PDKV Akola) परिक्षेत्रातील अकराही जिल्ह्यांमधील जे शेतकरी कृषी विद्यापीठाच्या (Agriculture University) तंत्रज्ञानाचा तथा बी- बियाणे, यंत्र अवजारांचा अवलंब करीत इतरांनाही त्याच्या वापरासाठी प्रवृत्त करीत आहेत, अशांची माहिती संकलित केली जात आहे.

यापैकी दोघांची दोन-दोन महिन्यांच्या कालावधीसाठी आयडॉल (PDKV Idol) म्हणून विद्यापीठातर्फे सन्मान केला जात आहे. अशांचे फलक लावून त्यावर त्यांची माहिती प्रसारित करण्याचा अभिनव उपक्रम विद्यापीठाने सुरू केला आहे.

प्रयोगशील शेतकरी, उद्योजकाची माहिती संबंधित जिल्ह्यामधील कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून संकलित केली जाते. नंतर अशा शेतकऱ्यांचे कार्य फलकाच्या रूपात संपूर्ण विदर्भात प्रदर्शित करण्यात येत आहे.

तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयांमधून कृषी पदवी प्राप्त केलेल्या व स्वतः कृषी व्यवसाय करून इतरांनाही रोजगार तथा मार्गदर्शक म्हणून सेवा देणाऱ्या कृषी पदवीधरांचाही या माध्यमातून सन्मान केला जात आहे. याद्वारे इतर कृषी पदवीधरांना प्रेरणा दिली जात आहे.

या श्रृंखलेअंतर्गत माहे मार्च व एप्रिल महिन्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील जादू फार्मचे संचालक, मामाचा वाडा कृषी पर्यटन केंद्राचे सर्वेसर्वा शेतकरी मोहन जगताप व प्रसिद्ध कृषी व्यावसायिक संगीता दीपक सव्वालाखे (जि. यवतमाळ) यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे हे दोन्ही आयडॉल विदर्भातील कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रांवर होर्डिंगच्या स्वरूपामध्ये झळकले आहेत. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे व त्यांची चमू शेतकरी व कृषी पदवीधर निवडण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT