Modern Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Modern Agriculture : आधुनिक शेती ही काळाची गरज : डॉ. राजेंद्र सरकाळे

बदलत्या काळात आधुनिक शेती ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी म्हसवड येथे केले.

टीम ॲग्रोवन

सातारा : बदलत्या काळात आधुनिक शेती ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे (Modern Agriculture) यांनी म्हसवड येथे केले. म्हसवड (जि. सातारा) माण तालुका अग्रोव्हेट संस्था (Agro-Tech Orginisation) संचलित कृषी स्नेह मेळावा २०२२ (Krushi Sneah Melava 2022) म्हसवड येथे आयोजित केला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख होते. यावेळी जीएसटी विभागाचे ॲडिशनल कमिशनर विलासराव इंदलकर, माजी अप्पर जिल्हाधिकारी भानुदास गायकवाड, माजी उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे व लक्ष्मण बोराटे, कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर आदी उपस्थित होते.

या वेळी विश्वंभर बाबर यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा सर्वोच्च डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार सातारा जिल्ह्याला प्रथमच मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना डॉ. सरकाळे म्हणाले, की देशाच्या सुरक्षा एवढीच अन्नसुरक्षा ही बाब महत्त्वाची आहे. देशसेवेएवढेच काळ्या आईची सेवा महत्त्वाची असून त्यासाठी कृषी पदवीधर यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्यांसाठी सातारा जिल्हा बँक ही महत्त्वाची अर्थवाहिनी आहे. या बँकेच्या विविध उपक्रम व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

श्री. देशमुख म्हणाले, ‘‘शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. गेल्या काही वर्षात देशात अनेक स्थित्यंतरे झाली. या कालावधीत देशातील कृषी उद्योग प्रचंड अडचणीत आला आहे. पर्यायाने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला विविध माध्यमातून मदतीचा हात देणे गरजेचे आहे.’’

प्रा. बाबर यांनी संस्थेच्या कार्याची व आगामी काळातील उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. प्रा. तुकाराम माने यांनी प्रस्ताविक केले केले. पांडुरंग लुबाळ, मधुकर खरात, एम. ए .खरात यांचा सन्मान करण्यात आला.

कृषी स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे कार्याध्यक्ष विजय काटकर, प्रमोद खाडे, सुरेश बाबर, बाळासाहेब पोळ, राजेंद्र घनवट, तानाजी लांडगे, विजय शिंदे, बाळासाहेब केवटे तसेच त्यांच्या कृषी पदवीधारकांनी विशेष परिश्रम घेतले. रावसाहेब तुपे यांनी सूत्रसंचालन केले, तर संदीप केवटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

District Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत ११६ वैध, तर ४४ अर्ज अवैध

Bhama Askhed Dam: भामा-आसखेडचे आवर्तन लांबणीवर

Farmers Demand: पीक विम्यातील ‘ट्रिगर’ काढून पाठीत खंजीर खुपसला

Seed Germination Testing: दर्जेदार रोपांसाठी बियाण्यांची उगवणक्षमता, जोम महत्त्वाचा

Brown Biorefinery: शेतावरील ‘ब्राउन बायोरिफायनरी’

SCROLL FOR NEXT