Raju Shetti agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetti : राजू शेट्टींकडून ही अपेक्षा नाही, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका

Radhakrishna Vikhe Patil : शेट्टी हे उसाचे आंदोलन सोडून ते महसूलकडे आलेले दिसत आहेत. हरकत नाही. त्यांनी क्षेत्र बदलले असेल; पण त्यांनी उदाहरणदेखील सांगितले पाहिजे.

Team Agrowon

Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील प्रशासकीय विभागांमध्ये बदल्यांसाठी आर्थिक पिळवणूक होत असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहले होते. तसेच महसून विभागात हा सर्वात मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला होता.

यावरून राज्यात जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केली आहे. विखे पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना टीका केली आहे.

यावेळी विखे पाटील म्हणाले की, शेट्टी हे उसाचे आंदोलन सोडून ते महसूलकडे आलेले दिसत आहेत. हरकत नाही. त्यांनी क्षेत्र बदलले असेल; पण त्यांनी उदाहरणदेखील सांगितले पाहिजे. राज्यात प्रथमच महसूल खात्याच्या बदल्या पारदर्शी पद्धतीने होऊनही ते आरोप करत आहेत. त्यांच्यासारख्या नेत्यांकडून ही अपेक्षा नाही, असेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे हे सर्वात अपयशी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी टीका केली. याबद्दल बोलताना विखे-पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादीची विचित्र अवस्था झाली आहे. नेत्यांपासून ते खाली कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण काहीही बोलतात. त्यानंतर स्पष्टीकरण देतात. अशी ही राष्ट्रवादीची अवस्था तळ्यात-मळ्यात सुरू आहे.

त्यामुळे अजित पवार किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात याला फार महत्त्व नाही. तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी बदल्यांमध्ये पैसे घेतल्याचे एक उदाहरण दाखवावे. राज्यात महसूल खात्यातील बदल्या अत्यंत पारदर्शीपणे झाल्या आहेत.

शेट्टी यांच्यासारख्या व्यक्तीकडून अशी मुक्ताफळे उधळली जात आहे. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

शेट्टी यांनी पत्रात काय लिहलं होतं

काहीं वर्षांपूर्वी महसूल, गृह व सार्वजनिक बांधकाम विभाग ही भ्रष्ट्राचाराची कुरण असलेली खाती म्हणून ओळखली जायची. पण आज महसूल, बांधकाम, नगरविकास, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, ग्रामविकास, सहकार, गृह, जलसंपदा, वने, उत्पादन शुल्क, परिवहन यासह शासनाच्या कार्यालयीन कामकाजात अस्तित्वात असलेल्या जवळपास ५२ विभागातील अधिकारी यामध्ये तलाठी ग्रामसेवकापासून ते मंत्रालयीन सचिवापर्यंत सर्वच विभागामध्ये जनतेची अडवणूक करून आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहले होते.

गोकुळबाबत विखे पाटील आक्रमक

गोकुळच्या लेखापरीक्षणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी सुरू आहे. या चौकशीत जी अनियमितता आढळली, त्यानुसार संघाकडून खुलासे मागवून घेतले आहेत. त्याचा प्राथमिक अहवाल आला आहे.

मात्र, अद्याप तो आपल्यासमोर सादर झालेला नाही. तो सादर करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत. या अहवालात अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले असेल तर गोकुळवर कारवाई केली जाईल, असे विखे पाटील म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT