Nashik Winter Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : निफाड येथे किमान तापमान ११.२ अंशांवर

बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बुधवारपर्यंत (ता. ९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली तमिळनाडू पद्दूचेरीकडे येताना आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात (Temperature Fluctuation) चढ-उतार होत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील रविवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्र (Wheat Research Center) येथे ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची, तर सांताक्रूझ येथे सर्वाधिक ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ७) राज्यात निरभ्र आकाशासह कोरडे हवामान (Dry Weather Forecast) राहण्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बुधवारपर्यंत (ता. ९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली तमिळनाडू पद्दूचेरीकडे येताना आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून कोमोरिन भागापासून हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

राज्यात पहाटे गारठा, धुके आणि दव पडत आहे. दिवसभर उन्हासह कोरडे वारे वाहत आहेत. राज्यात किमान तापमान ११ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. कोकणात कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पार गेला आहे. तर उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्या वरच आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.६ (१२.७), जळगाव ३४.५ (१४.७), धुळे ३३ (११.४), कोल्हापूर ३१.१ (२०.५), महाबळेश्‍वर २७.२ (१५.५), नाशिक ३०.९ (१३.४), निफाड ३०.१ (११.२), सांगली ३२.२ (२०), सातारा ३०.९ (१६.९), सोलापूर ३३.५ (१८.१), सांताक्रूझ ३६.६(१९.६), डहाणू ३६.१ (१९.७), रत्नागिरी ३५.४ (२३.१), औरंगाबाद ३१.६ (१३.०), नांदेड ३२.८ (१६.६), उस्मानाबाद - (१५.४), परभणी ३२.४ (१४.९), अकोला ३५ (१८.४), अमरावती ३४.४ (१६.१), बुलडाणा ३२ (१७), ब्रह्मपुरी ३४.९ (१९.२), चंद्रपूर ३१.६ (१७.२), गडचिरोली ३२ (१६.४), गोंदिया ३२.५ (१६.२), नागपूर ३३.४ (१८.०), वर्धा ३३.२ (१८.८), वाशीम ३३.६ (१६.६), यवतमाळ ३३.५ (१६.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Insurance Scheme: सुधारित खरीप पीकविमा योजना जाहीर -अर्ज भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत

Environmental Activist Protest: सोनम वांगचुक यांचे उषोषण सातव्या दिवशीही सुरूच; प्रकृतीत बिघाड

Solapur Tree Plantation Scam: सोलापूरमधील ‘३३ कोटी वृक्ष लागवड’ घोटाळ्याचा तपास आता ‘सीबीआय’कडे

Fasting Food Prices: उपवासाच्या पदार्थांच्या दरात उसळी

AIMA Demands: अवजार विक्रेत्यांची चौकशी कृषी विभागानेच करावी

SCROLL FOR NEXT