Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : उन्हाचा चटका वाढला

हवामानातील परस्पर विरोधी स्थिती कायम असल्याने राज्याच्या तापमानातील तफावत कायम आहे. किमान तापमानात हळूहळू वाढ होत असून, कमाल तापमानात वाढ होत असल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे.

Team Agrowon

पुणे : हवामानातील परस्पर विरोधी स्थिती कायम असल्याने राज्याच्या तापमानातील तफावत कायम आहे. किमान तापमानात (Minimum Temperature) हळूहळू वाढ होत असून, कमाल तापमानात वाढ होत असल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे.

शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा (Maximum Temperature) पारा ३६ अंशापार गेला आहे. राज्याच्या तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कमाल तापमानात वाढ झाल्याने यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. दुपारच्या वेळी घामाच्या धारा वाहत आहेत.

किमान तापमानातही आता वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी गारठा टिकून आहे.

शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे उच्चांकी ३७.८ अंश तापमान नोंदले गेले. तर निफाड येथील गहु संशोधन केंद्रात नीचांकी ५.४ अंश तापमानाची नोंद झाली.

किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने राज्याच्या बहुतांशी भागात किमान तापमान १३ अंशांच्या पुढे गेले आहे. तर निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे.

सांताक्रूझ आणि सोलापुरात तापमान ३७ अंशांच्या पुढे तर जळगाव, सांगली, अमरावती, परभणी येथे तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले आहे. कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३४.३ (१०.८), जळगाव ३६.९ (१०.२), धुळे ३५.०(११.०), कोल्हापूर ३४.७ (१८.६), महाबळेश्वर २९.१ (१५.५), नाशिक ३४.१ (१२.०), निफाड ३२.४(५.४), सांगली ३६.३ (१६.७), सातारा ३४.५ (१७.२), सोलापूर ३७.४ (१६.३), सांताक्रूझ ३७.५ (१९.२), डहाणू ३१.२ (२०.५), रत्नागिरी - (२०.६), औरंगाबाद ३४.८ (१२.४), नांदेड - (१६.०), परभणी ३६.०(१४.७), अकोला ३७.८ (१४.५), अमरावती ३६.२(१३.९), बुलडाणा ३४.०(१७.६), ब्रह्मपुरी ३५.५ (१६.१), चंद्रपूर ३४.२(१६.०), गडचिरोली ३२.८(१३.०), गोंदिया ३३.५ (१३.४), नागपूर ३५.१ (१६.२), वर्धा ३६.५(१७.४), वाशीम ३६.४ (१४.८), यवतमाळ ३५.२ (१४.५).

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :
अकोला ३७.८, सांताक्रूझ ३७.५, सोलापूर ३७.४, जळगाव ३६.९, सांगली ३६.३, अमरावती ३६.२, परभणी ३६.०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT