SMART Project Agrowon
ताज्या बातम्या

SMART Project : शेतकरीकेंद्रित सुविधांवर बाजार समित्यांनी भर द्यावा

APMC News : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत ब बाजार समित्यांना शेतकरीकेंद्रित सुविधांच्या बळावर राज्य आणि विभागस्तरावर रॅकिंग दिले जाणार आहे.

Team Agrowon

Amravati News : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत ब बाजार समित्यांना शेतकरीकेंद्रित सुविधांच्या बळावर राज्य आणि विभागस्तरावर रॅकिंग दिले जाणार आहे.

या प्रकल्पाचे हे दुसरे वर्ष असून, राज्यातील ३०६ बाजार समित्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहन प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, पणन संचलनालय, स्मार्टचे तंत्र अधिकारी राजेंद्र पालेकर यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख प्रबोधिनी येथे बाजार समिती सचिवांकरिता बुधवारी (ता.१२) आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. डॉ. पंकज बनकर यांची या वेळी उपस्थिती होती. राजेंद्र पालेकर म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी या प्रकल्पाची पहिल्यांदाच अंमलबजावणी करण्यात आली. त्याआधारे रॅकिंग देण्यात आले होते.

या वर्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षीच्या अनुभवातून काही सुधारणा यंदा करण्यात आल्या आहेत. त्यासाठी संचालक, सचिव व इतर घटकांशी चर्चा करण्यात आली. त्यांनी सुचविलेल्या सूचनांचा अवलंब यंदा केला आहे. पायाभूत सुविधा, आर्थिक कामकाज निकष, वैधानिक कामकाज निकषांची पूर्तता बाजार समितीकडून कशाप्रकारे करण्यात आली.

त्यातील प्रत्येक बाबीसाठी गुणनिश्‍चित केले आहेत. त्या गुणानुक्रमाच्या आधारे रॅकिंग देण्याची तरतूद आहे. राज्यातील जास्तीत जास्त बाजार समित्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले. शेतकरीकेंद्रित सुविधा समित्यांनी पुरवाव्यात याकरिता जागतिक बॅंकेच्या निधीतून हा प्रकल्प राबविला जात आहे.

‘ॲग्रोवन’ची दखल

तंत्र अधिकारी राजेंद्र पालेकर यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित बातमी स्लाइडशोच्या माध्यमातून दाखविली. राज्य, देशच नाही तर जागतिकस्तरावर दखल घ्यावी अशा वृत्तपत्रात पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर या बाजार समित्या रॅकिंगमध्ये पिछाडल्याचे पहिल्या पानावर प्रकाशित करण्यात आले होते. त्यामुळेच प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेत बाजार समित्यांनी गुणानुक्रमानुसार सोयी सुविधांची पुर्तता करीत रॅकिंग मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: २०२६–२७ अर्थसंकल्पात तरुणांसाठी शिक्षण, रोजगार आणि क्रीडा क्षेत्रात मोठ्या घोषणा

Agricultural Machinery Subsidy: मिनी ट्रॅक्टर, उपसाधने पुरवठा योजनेसाठी अर्ज करा

SevaKarmi Plus: ‘सेवाकर्मी प्लस’ अभियानात ‘शबरी महामंडळ’ प्रथम

Rural Life: गोष्ट एका मायाळू जिवाची

Natural Farming Mission: नैसर्गिक शेती अभियानांतर्गत ५४ शेतकरी गट स्थापन

SCROLL FOR NEXT