Nagar Apmc Election Agrowon
ताज्या बातम्या

Nagar APMC Market : नगरला बाजार समिती तीन दिवस बंद राहणार

Maharashtra APMC News : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दरवर्षीप्रमाणे यंदाही संत श्री निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा येथे मुक्कामी आहे.

Team Agrowon

Nagar News : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दरवर्षीप्रमाणे यंदाही संत श्री निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा येथे मुक्कामी आहे. त्यामुळे बाजार समितीत १४ ते १६ जून या कालावधीत व्यवहार व लिलाव बंद राहणार असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

नगर येथे श्रीनिवृत्तिनाथांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर येथे दोन दिवस मुक्काम असतो. यंदा हा पालखी सोहळा गुरुवार (ता. १४) व शुक्रवार (ता. १५ जून) असा दोन दिवस मुक्कामी आहे. १६ जून रोजी ही दिंडी प्रस्थान करणार आहे.

सोहळ्यात सुमारे पस्तीस हजार वारकरी सहभागी आहेत. पालखी सोहळा मुक्काम तळ भुसार व फळे भाजीपाला यार्डवर असेल. त्यामुळे १४ ते १६ जून या तीन दिवसांकरिता समितीचे भुसार बाजार, कडबा बाजार व फळे, भाजीपाला बाजार बंद राहणार आहे.

त्यामुळे भुसार व फळे भाजीपाला उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल विक्रीस आणू नये. सदर दिंडी कालावधीमध्ये उपबाजार आवार नेप्ती येथे कांदा लिलाव नियमित चालू राहणार आहे, असे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून सांगण्यात आले.

सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी शहरातील अनेक जण येतात. वारकऱ्यांना सर्व सुविधा देण्यासाठी बाजार समितीचेही प्रयत्न असतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price: देशात कापसाचे दर नरमले

Maharashtra GSDP: राज्याचे स्थूल उत्पन्न होणार वर्षातून दोन वेळा प्रकाशित

Crop Compensation Issue: सुधारित पीकविमा योजनेमुळे भरपाईला ठेंगा

Fertilizer Shortage: देशातील खत टंचाईमुळे आयातीच्या हालचालींना जोर

Maharashtra Monsoon Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT