Rain Update
Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : अपेक्षेच्या पुढे जाऊन पाऊस

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यातील २७९ मंडळांपैकी २०५ मंडळात २६ सप्टेंबर अखेरपर्यंत अपेक्षेच्या पुढे जाऊन पाऊस (Marathawada Rain Update) झाला आहे. त्यापैकी १३० मंडळात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली आहे. दुसरीकडे बीड व उस्मानाबाद तालुक्यातील पाच मंडळात सोमवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासात अतिवृष्टी झाली.

यंदाचा पाऊस मराठवाड्यात लहरी स्वरूपाचा ठरला आहे. अलीकडे चार-पाच दिवसापासून बहुतांश भागात उसंत घेणारा पाऊस त्याआधी जवळपास २५ ते ३० दिवस विविध भागात कमी अधिक प्रमाणात उघाड देऊन गेला. पावसाचे असमान पडणे पिकांच्या नुकसानीस कारणीभूत ठरले आहे.

जवळपास १३० मंडळात झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठे नुकसान केले असतानाच कीड-रोगांसाठी पोषक वातावरणामुळे तसेच मध्यंतरी दिलेल्या प्रदीर्घ उघडिपीमुळे शेती पिकाचे नुकसानीत भर घातली गेली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात अपेक्षित पर्जन्यमानाच्या ११६ टक्के, जालन्यामध्ये १२९ टक्के, बीडमध्ये ११३ टक्के, लातूरमध्ये १०६ टक्के तर उस्मानाबाद जिल्ह्यात १११ टक्के पाऊस झाला आहे. अतिवृष्टी झाली असली तरी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत ८६ टक्केच पाऊस झाला आहे.

त्या पाठोपाठ धारूर तालुक्यातही केवळ ८३ टक्के व माजलगावमध्ये ९५ टक्के पाऊस झाला आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात झालेल्या पावसातही पावसाचा लहरीपणा दिसून आला.

बीडमधील २ मंडळात अतिवृष्टी

सोमवारी(ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाची औरंगाबाद जालना जिल्ह्यात उसंतच राहिली. बीड जिल्ह्यातील पाटोदा मंडळात ९२ मिलिमीटर तर दासखेडा मंडळात ६८.८ मिलिमीटर इतकी अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातील मांजरसुंबा मंडळात ४८.८ मिलिमीटर, चौसाळा ४८.८, नेकनूर ४८.८, थेरला २७.५, केज २४, विडा २४, नांदूर घाट २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किनी मंडळात २१ मिलिमीटर, निलंगा तालुक्यातील निलंगा मंडळात ४९.८ मिलिमीटर, चाकूर तालुक्यातील चाकूर मंडळात ३३.३, वडवळ मंडळात ३३.३, रेणापूर तालुक्यातील रेणापूर मंडळात २७, पोहरेगाव ३५, पळशी २४.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

उस्मानाबदमधील ३ मंडळात अतिवृष्टी

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर मंडळात ८९.८, मंगरूळ मंडळात ८९.८ मिलिमीटर व उमरगा तालुक्यातील डाळिंब मंडळात ६६.८ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. याच तालुक्यातील सलगरा मंडळात ६३.३ मिलिमीटर पाऊस झाला. उस्मानाबाद ग्रामीण मंडळात २३.८ मिलिमीटर केशेगाव ३०.८ भूम तालुक्यातील भूम मंडळात २६ उमरगा तालुक्यातील मुरूम मंडळात ३१ लोहारा तालुक्यातील जेवळी मंडळात ३९.५ मिलिमीटर पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

Aquatic Ecosystem : कांदळवने : एक महत्त्वाची जलीय परिसंस्था

Healthy Ambadi : आरोग्यदायी पौष्टिक अंबाडी

SCROLL FOR NEXT