Madhukarraje Ardad agrowon
ताज्या बातम्या

Divisional Commissioner : मधुकरराजे आर्दड यांनी मराठवाडा विभागीय आयुक्तपदाचा स्विकारला कार्यभार

Marathwada : औरंगाबाद विभागीय आयुक्तपदी मधुकरराजे अर्दड यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. अदर्ड यांनी तत्काळ पदाचा कार्यभार आज स्विकारला.

Team Agrowon

Madhukarraje Ardad : सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर मराठवाडा विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय यांच्याकडे देण्यात आला होता. सरकारने छत्रपती संभाजीनगर येथीलच मृद व जलसंधारण आयुक्त मधुकरराजे आर्दड यांची मराठवाडा विभागीय आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यांनी आपला पदभारही स्वीकारला आहे.

अपर उपसचिव नितीन गद्रे यांनी या संदर्भातील आदेश काढले. श्री. आर्दड यांना तत्काळ विभागीय आयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्यास सांगितले. त्यानुसार श्री. आर्दड यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. मृद व जलसंधारण आयुक्त छत्रपती संभाजीनगर या पदाचा अतिरिक्त कार्यभार तुर्तास त्यांनीच सांभाळावा, असे देखील पत्रात नमूद आहे.

आर्दड हे मुळचे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्याच्या राजाटाकळी येथील आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे ते जिल्हा परिषदेचे सीईओ, सिडकोचे प्रशासक म्हणून कार्यरत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Protection: पोलिसांच्या परिपत्रकाने कथित गोरक्षकांना रान मोकळे

Cow Animal Status: गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही

Tur CMD Disease: तुरीतील ‘सीएमडी’ रोगाला प्रतिकारक जनुक शोधले

Sugar Price: साखरेच्या दरात वाढ

US Soybean Production: अमेरिकेत सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT