Sunil Kendrekar : सुनील केंद्रेकरांच्या राजीनाम्याला न्यायालयाकडून स्थगिती

Sunil Kendrekar Voluntary Retirement: मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सेवेचे दोन ते अडीच वर्षे शिल्लक असताना अचानक स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून अर्ज न स्वीकारण्याचे आदेश शासनाला देण्यात आले आहेत.
sunil kendrekar
sunil kendrekaragrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar News : मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar)यांनी अचानक स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून शासनाला केंद्रेकरांचा अर्ज न स्वीकारण्याचा निर्णय दिला आहे.

sunil kendrekar
Kharif Sowing : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट एकरी १० हजार रुपये द्यावे

राज्यातील धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून सुनील केंद्रेकरांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त पदावर काम केले आहे. सध्या ते मराठवाडा विभागीय आयुक्त या पदावर कार्यरत असून त्यांनी काही दिवसांपूर्वी अचानक स्वेच्छानिवृत्तीसाठी शासनाकडे अर्ज केला होता.

sunil kendrekar
विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर थेट बांधावर

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या या निर्णयावर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नेमलेल्या समितीवर केंद्रेकरांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मार्च 2024 पर्यंत ही योजना अंतिम टप्प्यात आली असेल, तोपर्यंत अर्ज स्वीकारू नये असे खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे

मराठवाड्यात वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रेकरांनी उपाय म्हणून एक सर्व्हे सुरु केला होता. त्यांनी छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना व लातूर जिल्ह्यात १२ टप्प्यात १०० प्रश्नांच्या आधारावर सर्व्हे केला.

या सर्व्हेनुसार एक अहवाल तयार करुन शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी दोन हंगामाच्या सुरवातील पेरणीसाठी शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी १० हजार एकरी मदत करण्याचा निकष काढला होता. तसा अहवाल सुनील केंद्रेकर यांनी राज्य सरकारकडे पाठवला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com